Ankita Lokhande : ‘मैं ससुराल नही जाऊंगी’ गाण्यावर अंकिताने धरला बॅचलर पार्टीत ठेका

सध्या बॉलिवूडमध्ये लगीन घाई सुरू आहे. रणबीर कपूर आलिया भट्ट, कतरीना आणि वक्की कौशल यासारखे प्रसिद्ध कलाकार लवकरचं लग्न करणार आहेत. या जोड्यांमध्ये आणखी एका जोडीचा समावेश झालाय. ती म्हणजे पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड विक्की जैन.

Ankita Lokhande : 'मैं ससुराल नही जाऊंगी' गाण्यावर अंकिताने धरला बॅचलर पार्टीत ठेका

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने केलेल्या बॅचलर पार्टीची जोरदार चर्चा सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.अंकिताच्या बॅचलर पार्टीच्या फोटो आणि व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या गर्ल गँगसोबत फुल ऑन एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे.

लग्नाआधी अंकिता लोखंडेने मंगळवारी एक बॅचलर पार्टी आयोजित केली, ज्यामध्ये तिने मैत्रिणींसोबत केलेली धमाल प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नाआधीची अकींता लोखंडेची बॅचलर पार्टी सोशल मिडियावर चर्चेत आहे.

अंकिता आणि विक्की जैन डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या नात्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगताना दिसते.

बॅचलर पार्टीच्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अंकिता तिच्या गर्ल गँगसोबत फुल ऑन एन्जॉय करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sneh Zala (@snehzala)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बॅकग्राउंडमध्ये ‘मैं ससुराल नहीं जाउंगी’या गाण्यावर अंकिताने बॅचलर पार्टीत ठेका धरला आहे.


हे ही वाचा – अंकिता लोखंडेची लगीन घाई! बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत बांधणार लग्नगाठ