घरमनोरंजनअश्विनीने सांगितली शिक्षणाची महती

अश्विनीने सांगितली शिक्षणाची महती

Subscribe

झी युवा वाहिनीवरील ‘कट्टीबट्टी’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहे. या मालिकेत अभिनेत्री अश्विनी कासार पूर्वाची भूमिका साकारते. ती म्हणते की या मालिकेत पूर्वाचे लग्न झाले असतानादेखील ती पीएचडीचे शिक्षण पूर्ण करायचे ठरवते. तसेच शिक्षणाविषयीचे माझेही मत आहे. शिक्षण हे प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात मजबूत हत्यार आहे आणि अभिनय करतानासुध्दा त्याचे विशेष महत्त्व आहे.

अश्विनीने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आपले शिक्षण पूर्ण केले. तिच्या मते सिनेइंडस्ट्रीतील जीवन अनिश्चित आहे. इथे तुमची जागा दुसरे कुणीही घेऊ शकते किंवा तुम्ही जे काही करत असता ते तुम्हाला आवडेनासे होते तेव्हाही शिक्षणच तुम्हाच्या मदतीला येेते. तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी नाही तर तुमच्या जीवनाच्या संपूर्ण विकासासाठी शिक्षण महत्वाचे आहे. आजच्या काळातील तरुण चंचल आहेत आणि त्यांना जे काही हवे आहे ते स्पष्टपणे सांगू शकतात, पण तरीही अशा स्थितीत तुम्हाला जे काही आवडते त्याचा अभ्यास करणे चांगले असते. कारण परिपूर्ण ज्ञान नेहमीच तुम्हाला मदत करते आणि हे ज्ञान कधीही वाया जात नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -