‘पार्टीमध्ये ड्रग्जची केली जाते ऑफर, नकार दिल्यावर टाकला जातो बहिष्कार’

actress bhojpuri tv akshara singh about drugs in bollywood sahers this
'पार्टीमध्ये ड्रग्जची केली जाते ऑफर, नकार दिल्यावर टाकला जातो बहिष्कार'

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले आहेत. सुशांतने आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही आहे. सध्या सीबीआय, ईडी आणि एनसीबी याप्रकरणात चौकशी करत आहे. या प्रकरणातील ड्रग्ज अँगलमध्ये आता बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. दरम्यान बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडणारी भोजपुरी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंहने आज तकशी बोलताना इंडस्ट्रीच्या ड्रग्ज कनेक्शविषयी काही खुलासे केले आहेत.

अभिनेत्री अक्षरा सिंह म्हणाली की, ‘इंडस्ट्रीत ड्रग्ज घेणाऱ्यांना हाय प्रोफाइल सोसायटीचे असल्याचे मानले जाते. देशभरात खूप वेगाने हे पसरत आहे. पण मुंबईत हे सर्वाधिक आहे. ही योग्य वेळ असून याची चौकशी त्वरित केली पाहिजे. आपल्या इंडस्ट्रीत गटवाद (ग्रुपिज्म) आहे. जितकी मोठी लोकं आहेत ते सर्व गट तयार करतात आणि पार्टी करतात, ड्रग्ज घेतात. पण त्यांच्या विरोधात एक-दोन लोकांनी आवाज उठवला तर त्यांच्या आवाज दडपला जातो. त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो. तुम्ही स्वतः पाहू शकता की, आता लोकं एकमेकांना वाचवताना दिसत आहेत.’

जया बच्चन यांच्या विधानावर ‘ती’ म्हणाली….

‘ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करता’, असे जया बच्चन राज्यसभेत बॉलिवूडच्या ड्रग्जप्रकरणाबाबत बोलताना म्हणाल्या होत्या. याबाबत अक्षरा म्हणाली की, ‘ताटात छेद करणे म्हणण्याऐवजी जयाजींनी तरुणांध्ये पसरत असलेल्या ड्रग्जचे व्यसन दूर करण्यासाठी मदत केली पाहिजे. जेणेकरून लवकरात लवकर नष्ट करता येईल. बॉलिवूडच्या या ड्रग्ज कनेक्शनविषयी त्यांना कदाचित माहिती असेल किंवा नसेलही पण आता इतकी मोठी नावे समोर आल्यानंतर त्या काय बोलतील हे विचारायला हवे.’

अक्षरा पुढे म्हणाली की, ‘टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ते खुलेपणाने केले जाते. बॉलिवूडमध्ये हाउस पार्टी असते पण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तर सेटवर देखील मी असे करताना पाहिले आहे. मी यात कधीच रस दाखविला नाही. यात सामील न होण्याचा कामावर परिणाम होतात. ऑफर मिळणे बंद होते. यामुळे मला फारशी काम मिळत नव्हती. पण मला अशा घाणेरड्या प्रकरणात अडकण्याची इच्छा नव्हती. मला कठोर परिश्रम आणि संघर्ष करून काम करायचे आहे.’


हेही वाचा – Bollywood Drug Probe: दीपिकानंतर दीया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB चौकशी