बॉलिवूडची बिल्लो रानी आणि बंगाली ब्यूटी म्हणून अभिनेत्री बिपाशा बासूने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. आयटम साँगमुळेही बिपाशा चर्चेत आली होती. पण आता एकही सिनेमा न करता बिपाशा कशी कमावते आणि तिची संपत्ती किती पाहुयात.
बिपाशाने वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. तसंच तिने अनेक चित्रपट केले ज्यामध्ये तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. पण लहानपणी तिला कोणीही पसंत करत नव्हते कारण ती खूप सावळी आणि लठ्ठ होती. परिस्थिती अशी होती की कॉलेजमध्येही तिचे मित्र तिला तिच्या काळ्या रंगावरुन चिडवायचे.
गेल्या 8 ते 9 वर्षांपासून बिपाशा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे, पण तरीही ती कोट्यवधींची कमाई करते. एकेकाळी अभिनेत्रीची तिच्या पतीपेक्षाही जास्त तिची संपत्ती होती. बिपाशा ही मलायका अरोरा आणि सुजैन खानसह “द लेबल लाइफ” नावाचा क्लोदिंग ब्रँड चालवते. रिपब्लिक वर्ल्डच्या रिपोर्टनुसार, बिपाशा जवळपास 124 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. बिपाशाचा मुंबईतील वांद्रात एक अलिशान बंगला असून त्याची किंमत 16 कोटींच्या जवळपास आहे. सोबतच तिला लक्झरियस, महागड्या गाड्यांचीही आवड आहे.
बिपाशाने 2001 मध्ये ‘अजनबी’ या थ्रिलर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने सुपरहिट हॉरर फिल्म ‘राज’ मध्ये काम केले. हा चित्रपट तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर बिपाशाने एकाच जॉनरचे अनेक चित्रपट केले.
बिपाशाने एका पोस्टमध्ये सांगितले होते की, ‘जेव्हा सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली होती. प्रत्येक पेपरमध्ये बातमी छापून आली की कोलकात्यातील एक सावळी मुलगी विजेती ठरली. माझे टॅलेंट कोणी पाहिली नाही. माझ्या घरातही माझ्या काळ्या रंगाची चर्चा होती. माझ्या रंगामुळे मी इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी मानली जात होती. या काळात, मला अनेक स्किन केअर एंडोर्समेंट ऑफर मिळाल्या पण मी त्या नेहमी नाकारल्या.’
बिपाशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली होती. याआधी तिचे अभिनेता डिनो मोरियासोबत अफेअर होते, नंतर ती जॉन अब्राहमसोबत बराच काळ रिलेशनशिपमध्ये होती. पण जवळपास 9 वर्षांनी त्यांचे नाते तुटले. यानंतर, काही वर्षांनी तिने हरमन बावेजाला डेट केले आणि अखेरीस टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी तिचा विवाह झाला. बिपाशाकडे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिराती आहेत. यातून बिपाशा बक्कळ कमाई करत राहते. बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असलेली बिपाशा अनेकदा करण सिंग ग्रोवरसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते. याशिवाय आई झाल्यापासून ती तिचा पूर्णवेळ लेक देवीसोबतच घालवते.