घरताज्या घडामोडी'अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होते महापालिकेचे अधिकारी',बॉलिवूडकर संतापले!

‘अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होते महापालिकेचे अधिकारी’,बॉलिवूडकर संतापले!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनाधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा चालवला. पालिकेच्या या कृतीवर अनेक स्तरावरून टीक करण्यात आली. खरतर कंगना आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक झाली. यातूनच काल कंगनाच्या कार्यालवर ही कारवाई करण्यात आली. यानंतर बॉलिवूडमधूनही अनेक प्रतिक्रीया उमटल्या. भाजपाच्या अनेक नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या या कारवाईचा निषेध केलेला असताना आता बॉलिवूडमधून अनुपम खेर यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले आहे.

अनुपम खेर यांनी ट्विटकरून आपली प्रतिक्रीया दिली आहे. कोणाचे घर इतक्या निर्दयीपणे तोडणे चुकीचे आहे. याचा सर्वाधिक प्रभाव कंगनाच्या घरावर नाही, तर मुंबईच्या जमीन आणि आत्म्यावर होणार आहे” असे अनुपम खेर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकणात निष्पक्ष तपासासाठी आवाज उठवताना बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरही सडकून टीका केली होती.

- Advertisement -

अनुपम खेर दिया मिर्झाने देखील ट्विट करत पालिकेच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. “कंगनाच्या पाकव्याप्त काश्मीर या विधानाशी मी सहमत नाही. पण मुंबई महापालिकेने केलेली ही कारवाई चुकीची आहे. आत्ताच का? न सांगता अचानक कारवाई का केली? जेव्हा हे अनधिकृत बांधकाम उभारलं जात होतं तेव्हा महापालिकेचे अधिकारी कुठे होते?” अशा आशयाचं ट्विट दिया मिर्झाने केलं आहे.


हे ही वाचा – कंगना महाराष्ट्राची पुढील मुख्यमंत्री होईल…; दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे वक्तव्य


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -