घरमनोरंजनGirija Prabhu : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्रीनं २४ व्या...

Girija Prabhu : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीनं २४ व्या वर्षी घेतलं घर

Subscribe

मुंबईमध्ये स्वत:चं हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते खूप मेहनत घेतात आणि आपले हे स्वप्न पूर्ण देखील करतात. काहींना हे स्वप्न पूर्ण करायला बराच कालावधी लागतो. तर काही जण अगदी कमी वयामध्ये मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी मुंबईमध्ये घर खरेदी केले.

गेल्या काही महिन्यात मराठा सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली. काहींनी नवीन गाडी खरेदी करत आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. तर काहींनी नवीन घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, रोहित माने, अक्षय केळकर, पृथ्वीक प्रताप, अश्विनी कासार यांसारख्या अनेक कलाकारांनी मुंबईमध्ये घर खरेदी केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by @girijaprabhu_official

- Advertisement -

आता या अभिनेत्रींच्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री गिरीजा प्रभूने देखील मुंबईत हक्काचे घर खरेदी केलं. मार्गशीष महिन्यात तिने हे घर खरेदी केले होते. तेव्हाच तिने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. गिरीजा प्रभू हिने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी नवं घर घेतलं आहे. या घरातील पूजेचा फोटो तिने शेअर केला आहे. गिरीजाच्या नव्या घराच्या दारावर लावलेल्या नेमप्लेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

गिरीजाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. नवीन ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने आपल्या नव्या घराच्या दारामध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये गिरीजाने आपल्या नव्या घराची नेमप्लेट दाखवली आहे. या नेमप्लेटवर मध्यभागी मराठीत पांढऱ्या अक्षरामध्ये ‘गिरीजा प्रभू’ असे नाव लिहिण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @girijaprabhu_official

- Advertisement -

 गिरीजाच्या फोटोंना लाइक कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तिला नवीन घर घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. गिरीजा प्रभूला ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळे गिरीजा घराघरांमध्ये पोहचली. गिरीजा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. आपल्या मालिकेसोबतच तिच्या पर्सनल लाइफ विषयचे अपडेट्स ती या माध्यमातून देत असते.

गिरीजाने २७ नोव्हेंबर रोजी तिचा २४ वा वाढदिवस साजरा केला होता. ती सध्या मालिकेत नित्याच्या भूमिकेत दिसतेय. २५ वर्षांनी परतून आलेली नित्या आता चाहत्यांची लाडकी बनली आहे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -