घरताज्या घडामोडीपैसे थकवणाऱ्यांवर भडकली हेमांगी, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप!

पैसे थकवणाऱ्यांवर भडकली हेमांगी, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप!

Subscribe

चंदेरी दुनीयेत झळकणाऱ्या कलाकारांचे आयुष्य पडद्यावर जितके साधे सरळ दिसतं ते तस नसतं. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेकदा त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला ही मिळत नाही. सेटवर हे कलाकार अनेकदा १० – १२ तासांहूनही अधिक काळ काम करतात. मात्र या कामाचे पैसे त्यांना ९० दिवसांनंतर मिळतात. यावर अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सडकून टिका केली आहे.

बऱ्याच serials च्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये…छान मस्त! पण ते 90 days credit चं भूत अजून ही मानगुटीवर आहे… आधीच…

Posted by Hemangi Kavi-Dhumal on Tuesday, July 7, 2020

- Advertisement -

शूटिंगला सुरुवात तर झाली, मात्र त्या कामाचे पैसे कलाकारांना ९० दिवसांनंतर मिळणार. त्यामुळे खर्चाचं आणि आयुष्याचं गणित बसवायचं कसं असा सवाल हेमांगीने केला आहे.

हेमांगी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

बऱ्याच serials च्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये…छान मस्त! पण ते ९० days credit चं भूत अजून ही मानगुटीवर आहे… आधीच १०० दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही १०० दिवसांची भर! ३६५ पैकी २०० दिवस पैसे account ला जमा होणार नाहीत…कर्ज घेतलेल्या बँकेत कसं पाऊल ठेवावं कळत नाहीये! Insurance policy चे premiums कसे भरायचे?  घरात दोघे ही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचं काय? उरलेल्या १६५ दिवसांमध्ये या पैशांसाठी सतत phone करायचे, messages करायचे… आज …उद्या… या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही! कलाकार आणि techincal team कडून full support ची अपेक्षा! पण payment च्या बाबतीत आम्ही अजिबात अपेक्षा करायची नाही! आता तर ‘new normal’ सुरू झालंय! कलाकाराने स्वतः make up, hair, costumes करायचे, स्वतःच spot दादा व्हायचं! आणि मुख्य म्हणजे वेळेत ७ च्या shift ला, महिला कलाकारांना तर ४.३० वाजता उठून ६.३० च्या call time ला हजर रहायचं… पण मिळणाऱ्या payment चं timing? ते आधी ही गंडलेलं होतं आता ही तसच गंडणार आहे! हे कोण monitor करणार? Contract मध्ये तसं लिहूनच येतंय… म्हणजे ज्याला काम करायचंय तो करेल… ज्याला हे contract पटत नसेल त्याने अजून १०० काय ३६५ दिवस घरात बसून काढेल! काहीच कसं वाटत नाही यार हे contract ready करताना! निदान काही महिने तरी ३० दिवसाचं credit ठेवावं!

- Advertisement -

हे ही वाचा – माझा प्रवास सोप्पा नव्हता; धमक्या आल्या, आत्महत्या करावीशी वाटली!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -