अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात केले दाखल

आईला हार्ट अटँक आला असताना देखील जँकलिनले आईला भेटायला जाता येणार नाहीये. जॅकलिन आईला भेटण्यासाठी आतूर झाली असून सध्या ती प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे.

Actress Jacqueline Fernandez mother heart attack
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला ह्दयविकाराचा झटका, रुग्णालयात केले दाखल

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसचे (Jacqueline Fernandez)  सध्या वाईट दिवस सुरू आहेत. जॅकलिनची आई किम फर्नांडिस यांना हृदयविकाराचा झटका आला असून (Actress Jacqueline Fernandez mother heart attack)
उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जॅकलिनची आईच्या जिवाचा धोका टळला आहे. असे असले तरी काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. जॅकलिनचे आई वडील सध्या बेहरीन येथे राहतात आणि जॅकलिन सध्या मुंबईत आहे. त्यामुळे जॅकलिन सध्या तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात असून आईच्या प्रकृतीचे अपडेट घेत आहे.

जॅकलीनवर सकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिग प्रकरणात मुंबईत चौकशी सुरू आहे. तिला देशाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आईला हार्ट अटँक आला असताना देखील जँकलिनले आईला भेटायला जाता येणार नाहीये. जॅकलिन आईला भेटण्यासाठी आतूर झाली असून सध्या ती प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे.

२०२१ वर्षाच्या शेवटच्या दिवसात जॅकलिन सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आली होती. या प्रकरणी जॅकलिनला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून तिला देशाबाहेर जाण्यास परवानगी नाही. सुकेश चंद्रशेखरवर २०० करोडच्या मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले असून २०० करोडमधील १० करोड रुपये जॅकलिनवर खर्च केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जॅकलिनवरची चौकशी सध्या सुरू आहे.

सुकेश चंद्रशेखरने जॅकनील १० करोड रुपयांचे महागडे गिफ्ट्स दिले होते. ज्यात महागड्या लग्झरी गाड्या, ५२ लाखांचा घोडा, ४ पर्शियन मांजरी आणि यासारख्या अनेक महागड्या वस्तूंचा समावेश आहे. सुकेश आणि जॅकलिन यांचे अफेअर्स असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सुकेश सोबतचा पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये जॅकलिनच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली.


हेही वाचा – Money Laundering Case : जॅकलिन खोटारडी…, ईडी चौकशीत सुकेश चंद्रशेखरने केला धक्कादायक खुलासा