घरमनोरंजनआणि...धपकन पडली काजोल

आणि…धपकन पडली काजोल

Subscribe

काजोल जशी आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, तशीच ती एका विचित्र गोष्टीसाठीदेखील प्रसिद्ध आहे. काजोल नेहमीच कुठे ना कुठेतरी पडत असते. व्हिडिओ झाला व्हायरल.

काजोल ही चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिचे चित्रपट येत नसले तरीही तिचा चाहतावर्ग मात्र कमी झालेला नाही. काजोल जशी आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, तशीच ती एका विचित्र गोष्टीसाठीदेखील प्रसिद्ध आहे. काजोल नेहमीच कुठे ना कुठेतरी पडत असते. अशीच प्रचिती नुकत्याच एका मॉलमध्ये आली. काजोल चालता चालता जमिनीवर धपकन पडली. हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.

नक्की काय घडलं?

काजोल एका इव्हेंटसाठी मॉलमध्ये आली होती. बॉडीगार्ड्सच्या घेरावातच काजोल चालत पुढे जात होती. आजूबाजूला चाहत्यांचा प्रचंड गराडा आणि आरडाओरडादेखील होता. अचानक चालता चालता काजोलचा पाय घसरला आणि ती जमिनीवर धापकन पडली. तोल गेल्यानंतर काजोलनं स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती सावरू शकली नाही. तिच्या एका बॉडीगार्डनं हात देऊन तिला आधार दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पडल्यानंतर तिला काही दुखापत झाली आहे का? याची माहिती अजूनही मिळालेली नाही.

- Advertisement -

यापूर्वी वरूणनं पडताना वाचवलं

यापूर्वीदेखील काजोल बऱ्याचदा सेटवर पडली आहे. तिचा जवळचा मित्र करण जोहरनं एका मुलाखतीमध्ये काजोल ज्या सेटवर पडते तो चित्रपट चांगला चालतो असंही मजेनं म्हटलं होतं. तर ‘दिलवाले’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळीदेखील स्टेजवर काजोलचा पाय घसरला होता. त्यावेळी अभिनेता वरूण धवननं तिला सावरलं होतं. काजोलचा सतत पडत असण्याचा एक प्रकारे इतिहासच आहे. नुकतंच काजोलनं Elastigirl in Incrdibles 2 मध्ये आपला आवाज दिला असून ती सध्या कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त नाही. मात्र इन्स्टावर सतत ती आपले फोटोज पोस्ट करत असते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -