घरताज्या घडामोडीCoronavirus : अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण ; लेकीला मिस करत शेअर केली...

Coronavirus : अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण ; लेकीला मिस करत शेअर केली पोस्ट

Subscribe

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच या कोरोनाच्या विळख्यात आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकार अडकले आहेत. त्यातच आता अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर दिली आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच या कोरोनाच्या विळख्यात आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकार अडकले आहेत. त्यातच आता अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर दिली आहे. तिने टाकलेल्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी काजोल लवकर बरी व्हावी, या आशेने कमेंट केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिची मुलगी न्यासाचा फोटो शेअर करत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझे नाकही लाल झाले असल्यामुळे तुम्ही कोणी ते पाहू नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू. मिस यू न्यासा, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

मात्र, काजोलने स्वत:चा फोटो शेअर न करता मुलीचा फोटो शेअर केला आहे. कारण तिचे असे म्हणणे आहे की, तिचे लाल नाक कोणी पाहू नये. म्हणून तिने तिच्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. न्यासा देवगणच्या हातावर सुंदर मेहंदी पाहायला मिळत आहे. याशिवाय हातातील अंगठीही खूपच आकर्षक दिसत आहे. काजोलच्या या पोस्टवर सर्वजण तिच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी अभिनेत्री प्रियांका चोप्राने काजोलची मुलगी न्यासा हिचे वर्णन ‘स्टनिंग’ असे केले आहे.

- Advertisement -

‘हे’ सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले

काजोलसमोर अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, एकता कपूर, नकुल मेहता, नोरा फतेही, करीना कपूर खान, अमृता अरोरा, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले.


हे ही वाचा – Lata Mangeshkar यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला, प्रकृतीत सुधारणेची रुग्णालयाची माहिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -