घरमनोरंजनअभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Subscribe

नुकतच बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौतला कोरोनाची लागण झाल्याची महिती समोर आली आहे. कंगनाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या कोरोना व्हयरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच बळावत असल्याचे दिसून येत आहे. नुकतच बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौतला कोरोनाची लागण झाल्याची महिती समोर आली आहे. कंगनाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटरने कंगनाचे अकाऊंट कायमचे सस्पेंड केल्यानंतर कंगनाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहले आहे की,”गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ आणि अशक्तपणा वाटत होतं. हिमाचलला जाऊ शकतो असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. मला काही कल्पनाच नाही आहे की हा व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय, आता मला एवढं माहिती आहे की मी

त्याचा सामना करून नक्की संपवेन, कोणत्याही शक्तीला तुमच्यापेक्षा मोठे  होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल. चला या कोविड-19 चा विनाश करूया, हा काही नाही फक्त एका ठराविक काळाकरता आलेला ताप आहे ज्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि लोकांना मानसिक त्रास देत आहे. हर हर महादेव”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

कंगनाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत तिच्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच कंगनाला पटकन कोरोना व्हायरस पासून सुटकरा मिळवा यासाठी तिला विश देखील करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुंबावर कोरोनाचे सावट, एक वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह तर शिल्पाची टेस्ट निगेटिव्ह

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -