‘जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू’, अफगाणिस्तान-तालिबान संघर्षावर कंगनाची प्रतिक्रिया

Kangana Ranaut Gives Reasons Why South Superstars Are Such A Rage Says Shouldnt Allow Bollywood To Corrupt Them
बॉलीवूडकरांपासून सावध राहा, कंगनाचा साऊथ स्टार्सला इशारा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. देशासह जगातील प्रत्येक घडामोडींवर तिच लक्ष्य असते. त्यामुळे ती जगातील घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींबाबत आपले मत सोशल मीडियावर व्यक्त करत असते. आता कंगनाने अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षावर आपले मत व्यक्त केले असून ते सध्या चर्चेत आले आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर भारताचीही अवस्था आजच्या अफगाणिस्तानसारखी असती, असे कंगनाचे मत आहे. कंगनाने फेसबुकवर काही व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करत अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षावर मत व्यक्त केले आहे.

नक्की कंगना काय म्हणाली?

कंगना म्हणाली की, ‘आपण आज हे मुकाटपणे पाहत आहोत, उद्या हेच आपल्यासोबतही घडू शकते. मी सीएएच्या समर्थनार्थ लढाई लढली हे चांगलं झालं. माझी संपूर्ण जगाला वाचवण्याची इच्छा आहे, पण यासाठी माझ्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे. देशात सीएए कायदा आणला यासाठी मी आपल्या सरकारचे आभार मानते. त्यांनी हा कायदा आणून आशावाद दाखवला.’

It’s true right now Afghanistan needs us, all those dramebaaz who cried foul for Palestine Muslims are enjoying brutal…

Posted by Kangana Ranaut on Sunday, August 15, 2021

 

‘सर्वच हिंदू, शीख, जैन, इसाई, बुद्धिस्ट, पारसी आणि शेजारील इस्मामिक देशांतील इतर नागरिकांना राहण्याकरता जागा मिळेल, मी अफगाणिस्तानसाठी प्रार्थना करते. अफगाणिस्तान इस्लामिक देश असण्यापूर्वी एक हिंदू आणि बुद्धिस्ट देश होता,’ अशी कंगना म्हणाली.

Do you know Afghanistan was a Hindu and Buddhist nation before Islam happened to it !!

Posted by Kangana Ranaut on Monday, August 16, 2021

त्यानंतर पुढे कंगना म्हणाली की, ‘पाकिस्तान तालिबानचे पालन करते आणि अमेरिका त्यांना शस्त्र पुरवते. आता तालिबान आपल्या किती जवळ आला आहे, जर मोदी नसतील तर उद्या ते आपण असू’

 

Watch this and remember Pakistan nurtures Talibanis and America gives them weapons, Talibanis are so close to you now watch this could be you tomorrow if there is no Modi !!

Posted by Kangana Ranaut on Monday, August 16, 2021


हेही वाचा – अफगाणिस्तानची परिस्थिती पाहून रिया चक्रवर्ती म्हणाली, या कृती विरोधात आवाज उठवा…