घरमनोरंजनती आली , तिनं पाहिलं... शाहिद अन् करीना समोरासमोर!

ती आली , तिनं पाहिलं… शाहिद अन् करीना समोरासमोर!

Subscribe

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा काल मुंबईत पाडला. अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता शाहिद कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमध्ये एकेकाळी ज्या कपलची प्रचंड चर्चा झाली, ते कपल म्हणजे शाहिद कपूर आणि करिना कपूर खान. त्या कपलनं चाहत्यांना धक्का देत वेगळं व्हायचा निर्णय घेतला, त्यांच्या ब्रेकअपचं कारण अद्यापही त्यांनी सांगितलं नाही. पण आता दोघेही आपापल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. त्यानंतर ते फार कमी वेळा एकमेकांसमोर आलेत पण त्या दोघांनी एकमेकांशी बोलणं नेहमीच टाळलं.

- Advertisement -

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहिद हा चित्रपट निर्माते राज आणि डीके यांच्यासोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसत आहेत. तिघांच्या हातात ट्रॉफी दिसत आहे.  त्यावेळी त्याच्या समोरून करिना कपूर जाते, यावेळी शाहिदसोबत असलेले राज आणि डिके यांना करिना कपूर हाय हॅलो करताना दिसते, तर शाहिदही तिच्याकडे पाहतो. पण करिना शाहिदसोबत काही न बोलताच पुढं जाते आणि फोटोसाठी पोज देते. शाहिद आणि करिनाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

- Advertisement -

व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव

शाहिद आणि करीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, “जसं करीना शाहिदला इग्नोर करत आहे, तसंच आयुष्यातील समस्यांना इग्नोर करा.” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “जर हे दोघे कपल असले असते तर ही बॉलिवूडमधील बेस्ट जोडी असती.”

करीना आणि शाहिद 2007 मध्ये एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं. करीनानं शाहिदसाठी नॉन व्हेज खाणं सोडलं होतं, असं तिनं कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितलं होतं. पण काही वर्षानंतर शाहिद आणि करीना यांचा ब्रेकअप झाला. करीनानं 2012 मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केलं. तर शाहिदनं 2015 मध्ये मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -