Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला होणार अटक?

वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेला होणार अटक?

आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांनी केतकी विरोधात तक्रार दाखल केली होती.

Related Story

- Advertisement -

आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री केतकी चितळेच्या(ketaki chitale) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केतकी नेहमी वेगवेगळ्या मुद्यावंर भाष्य करत असते आता केतकीने केलेलं एक वक्तव्य तिला चांगलेच भोवणार असल्याचे दिसतेय. केतकीने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी कायद्याच्या कचाट्यात अडकली असून तिला अटक होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. एका जुन्या प्रकरणात ठाणे कोर्टाने  केतकीचा अटकपूर्व जामीन फेटाळला असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

केतकी सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो किंवा सोशल मीडियावरील ट्रोलर्सची कानऊघडणी करने असो. केतकीसाठी हे काही नवे नाही. दरम्यान, गेल्या वर्षी केतकीनं 1 मार्च 2020 रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती, या पोस्टमध्ये लिहलं होतं की, नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” यानंतर अनेकांनी तिच्या या पोस्टवर आक्षेप नोंदवत तिच्यावर टीका केली होती. केतकीच्या या पोस्टमुळे अनेक दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या यामुळे तिच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती.

- Advertisement -

आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांनी केतकी विरोधात तक्रार दाखल केली होती. संबधीत प्रकरणी आता ठाणे कोर्टाने केतकीचा अटकपूर्ण जामीन फेटाळला असून तिला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हे हि वाचा – Kangna Ranaut Thalaivi रिलीज अन् कॉन्ट्रोवर्सी, जयकुमारची आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याची मागणी

- Advertisement -