Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अभिनेत्री किम शर्मा करतेय टेनिस प्लेयर लिएंडर पेसला डेट,गोवामधील रोमँटिक फोटो झाले...

अभिनेत्री किम शर्मा करतेय टेनिस प्लेयर लिएंडर पेसला डेट,गोवामधील रोमँटिक फोटो झाले व्हायरल

अभिनेत्री किम शर्माचे नाव काही वर्षांपुर्वी क्रिकेटर युवराज सिंह सोबत जोडले गेले होते.

Related Story

- Advertisement -

मोहब्बतें फेम किम शर्मा (Kim Sharma)अनेक दशकापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे, पण किम शर्माच्या व्यक्तीगत जीवनातील अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतात. आता किमची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये किम टेनिस चॅपिंयन लिएंडर पेस (Leander Paes) सोबत दिसत आहे. दोघांच्याही या व्हायरल फोटोमुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये दोघेही एकमेकांना डेक करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. नुकतच किम शर्माला लिएंडर पेस सोबत गोवामध्ये स्पॉट करण्यात आलं. व्हायरल फोटोमध्ये दोघं अगदी जवळ असल्याचे दिसतेय. दोघांनी काहिश्या रोमाँटिंक अंदाजात फोटो काढले आहेत. अभिनेत्री किम शर्माचे नाव काही वर्षांपुर्वी क्रिकेटर युवराज सिंह सोबत जोडले गेले होते. दोघांना अनेकदा क्वॉलिटी टाइम स्पेंड करतांना पाहण्यात आलं होत. पण व्यक्तीगत कारणांमुळे त्यांनी एकमेकांपासू दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.(actress Kim Sharma is dating Tennis player Leander Paes , romantic photo from Goa goes viral)

काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. तसेच यानंतर क्रिकेटर युवराज सिंहने हेजल कीच हिच्यासोबत विवाह केला. आणि किम शर्माने अली पुंजानी सोबत लग्नगाठ बांधली होती. यानंतर, अली सोबत किमने 2016 साली घटस्फोट घेतला होता.
टेनिस चॅपिंयन लिएंडर पेस याच्या व्यक्तीगत आयुष्याबाबत सांगायचे झाल्यास लिएंडरला एक मुलगी असून त्याने रिया पिल्लै सोबत विवाह केला होता. रिया पिल्लै यापुर्वी अभिनेता संजय दत्त सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. व्यक्तीगत मतभेदानंतर लिएंडर आणि रिया यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.- Advertisement -

हे हि वाचा – दिया मिर्झाच्या घरी चिमुकल्याचे आगमन, जीवघेण्या इंफेक्शनमुळे करण्यात आली Premature डिलीवरी 

- Advertisement -