बहुचर्चित ‘वेडात वीर दौडले सात’ मध्ये अभिनेत्री माधुरी पवारची लागली वर्णी

‘महाराष्ट्राची महाअप्सरा’ अशी ओळख असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार हिने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नृत्या बरोबरच छोट्या पडद्यावरील ‘वाहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा असो की ‘रानबाजार’ वेबसिरीज मधील राजकारणातील एक महत्वकांशी, करारी प्रेरणा सायाजीराव पाटील साने ची भूमिका माधुरी पवारने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळविली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)

 अभिनेत्री माधुरी पवारने कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकेत ‘टाइप कास्ट’ न होता आपल्या दमदार अभिनयातून आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. आता माधुरीच्या चाहत्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आमच्या हाती लागली असून माधुरी लेखक, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी बहुचर्चित, मराठी – हिंदीसह पाच भाषांमध्ये निर्मिती होत असलेल्या ‘वेडात वीर दौडले सात’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटतात महत्वपूर्ण भूमिका साकारत असल्याचे समजते. माधुरी पवार नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी मात्र आपल्याला काही काळ वाट बघावी लागणार आहे.


हेही वाचा :

आयुष्यात पहिल्यांदा Pizza खाल्ला… हेमांगी कवीने सांगितला ‘व्हॅलेंटाइन डे’चा किस्सा