घरमनोरंजनवयाच्या ४८ व्या वर्षी अभिनेत्री मंदिरा बेदी झाली दुसऱ्यांदा आई!

वयाच्या ४८ व्या वर्षी अभिनेत्री मंदिरा बेदी झाली दुसऱ्यांदा आई!

Subscribe

मंदिरा बेदीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

वयाच्या ४८ व्या वर्षी अभिनेत्री मंदिरा बेदी दुसऱ्यांदा आई बनली. अभिनय किंवा चित्रपटांपेक्षा आपल्या फिटनेससाठी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिचे पती राज कौशल यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं आहे. या दाम्पत्याने मुलीला २८ जुलै २०२० रोजी दत्तक घेतले होतं पण तिचे फोटो आणि याबाबतची माहिती दसऱ्याच्या मुहूर्तावर चाहत्यांना शेअर केली.

- Advertisement -

मंदिरा आणि राज यांनी आपल्या मुलीचं नाव तारा बेदी कौशल असे ठेवले असून मंदिरा बेदीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबत मंदिराने फॅमिली फोटो देखील शेअर केला आहे. फोटोमध्ये तिचे पती राज, मुलगा वीर आणि मुलगी तारा दिसत आहे.

मंदिराने आपल्या मुलीची ओळख करुन देताना लिहिलं आहे की, “तारा आमच्यासाठी प्रार्थना बनून आली आहे. आमची चिमुकली तारा. वीरने मोठ्या मनाने आणि प्रेमाने आपल्या बहिणीचं स्वागत केलं. मला अतिशय आनंद आहे की तारा २८ जुलै २०२० आमच्या कुटुंबाचा भाग बनली.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -