घरताज्या घडामोडीNora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही Instagram वरुन गायब, अकाऊंट केलं डिलीट

Nora Fatehi: अभिनेत्री नोरा फतेही Instagram वरुन गायब, अकाऊंट केलं डिलीट

Subscribe

नोरा सध्या दुबईमध्ये सुट्ट्यांच्या आनंद घेत आहे. नोराने आज काही तासांपूर्वीच सुट्ट्यांचे फोटो शेअर केले होते

सध्या सोशल मीडियावर ‘डान्स मेरी रानी’  म्हणत धुमाकूळ घालणारी अभिनेत्री रोना फतेही (Nora Fatehi)  अचानक तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन गायब झाली आहे. नोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे ग्लमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. इन्स्टाग्रामवर नोराची जबरदस्त फॅन फॉलोविंग होती. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक डिलीट झाल्याने तिच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. गेली अनेक दिवस नोरा तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी तिच्या चाहत्यांना माहिती देत होती मात्र अचानक नोराने अकाउंट डिलीट करण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

इन्स्टाग्रामवर नारोचे ३७.६ मिलियन फॉलोवर्स होते. इन्स्टाग्रामवर नोरा फतेही टाइप केल्यानंतर सर्वात वरती नोराचे अकाउंट दिसायचे. मात्र आता इन्स्टाग्रामवरुन तिचे अकाउंट गायब झाले आहे. अकाउंट सर्च केल्यानंतर पेज नॉट फाउंड असा मेसेज दिसत आहे. नोराने तिचे अकाउंट डिलीट का केले असा प्रश्न आता तिच्या फॅन्सना पडल आहे.

- Advertisement -

नोरा सध्या दुबईमध्ये सुट्ट्यांच्या आनंद घेत आहे. नोराने आज काही तासांपूर्वीच सुट्ट्यांचे फोटो शेअर केले होते. नोराने सिंहासोबत फोटो शेअर करत म्हटले होते की, ‘आतापासून लॉयन एनर्जी असेल. आणखी काहीच नाही पण हे फार सुंदर आहे’. नोराचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. कोरोनातून बरी झाल्यानंतर नोरा पहिल्यांदाच सुट्ट्यांसाठी बाहेर गेली आहे.

- Advertisement -

नोराच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर नोराचा ‘डान्स मेरी रानी हे’ गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. गुरु रंघावा सोबतचा डान्स व्हिडीओ चाहत्यांनी डोक्यावर घेतला. नोरा आणि गुरु रंधावाचे हे दुसरे गाणे होते. याआधी त्यांनी ‘नाच मेरी रानी’ हे गाणे केले होते.


हेही वाचा – दीपिकाच्या छोट्या कपड्यांवर Kangana ची कमेंट, तर सलमानची उडवली खिल्ली

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -