नुसरत जहाँच्या मुलाचा पहिला लुक ३ महिन्यांनंतर व्हायरल, पहा फोटो

Actress nusrat jahan son's first photo viral on social media

बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बाळामुळे चर्चेत होती. नुसरत तिचा पहिला पती निखिल जैनपासून वेगळी झाली आणि नुसरतने तीन महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. नुसरतने तिच्या मुलाचे नाव यीशान असे ठेवले. मुलाचे वडिल कोण यावरुन नुसरतला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. यीशान हा नुसरत आणि तिचा बॉयफ्रेंड यश दासगुप्ता यांचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे. नुसरतने सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक पोस्टमधून हे सिद्ध देखील झाले होते. परंतु नुसरतने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. दरम्यान नुसरतने तिच्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. गेली अनेक दिवस नुसरतचे चाहते तिच्या मुलाला पाहण्यासाठी आतूर होते.

नुसरत जहाँने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिच्या मुलाचा यीशान दिसत आहे. नुसरतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नुसरत यश दास गुप्ता आणि मुलगा इशान यांनी एकाच रंगाचे कपडे घातले आहेत. व्हिडिओमध्ये पहिल्यांदा यश दास गुप्ता समोर येतो त्यावर पप्पा असे लिहिले आहे. त्यानंतर नुसरतच्या फोटो आई असे लिहिलेले आहे. त्यानंतर पुढच्या फोटोमध्ये यीशानचा फोटो समोर येतो. नुसरतने शेअर केलेला व्हिडिओ हा दिवाळीतील असल्याचे म्हटले जात आहे. जांभळ्या रंगाचे कपडे घातलेल्या इशानचा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे.

नुसरत जँहाने तिच्या आणि यश दासगुप्ताच्या नात्याविषयी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. तिने मुलाने नाव ही यीशान यश दासगुप्ता ठेवण्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातील काही पुरावे देखील समोर आले होते.


हेही वाचा – प्रियंका आणि निक जोनसच्या घटस्फोटाबाबत मधू चोप्रा यांनी केला खुलासा, म्हणाल्या…