घरमनोरंजनअभिनेत्री पायल रोहतगीला अटक, सोसायटीत केला राडा

अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, सोसायटीत केला राडा

Subscribe

पायलला यापूर्वीही झाली होती अटक

बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. परंतु सोशल मीडियावरील ती पोस्ट पायलने हटवली आहे. यासह पायल हिच्यावर सोसायटीतील लोकांशी वारंवार भांडणे, आणि सोसायटी चेअरमनला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आले आहेत.

याप्रकरणी आता पायल रोहतगीला अहमदाबाद सेटेलाइट पोलिसांनी अटक केली आहे. २० जून रोजी झालेल्या सोसायटीच्या एजीएम मिटिंगमध्ये पायल रोहतगी सोसायटीची सदस्य नसतानाही आली. या मिटिंगमध्ये जेव्हा तिला बोलण्यास मनाई करण्यात आली तेव्हा तिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यासह, तिने सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलांवरूनही अनेकदा भांडण केले आहे.

- Advertisement -

पायलला यापूर्वीही झाली होती अटक

याआधीही पायलला एकदा पोलिसांनी अटक केली होती. राजस्थानच्या बूंदी पोलिसांनी तिला अहमदाबादहून अटक केली होती. परंतु राजस्थान कोर्टाकडून तिला जामीन मिळाला. २१ सप्टेंबर २०१९ रोजी पायलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये माजी स्वातंत्र्यसैनिक मोतीलाल नेहरू, माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले गेले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व युवक कॉंग्रेस नेते चर्मेश शर्मा यांनी पायल रोहतगीविरोधात तक्रार दाखल केली होती. याकारणामुळे तिला अटक करण्यात आली होती.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते पायल

अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या वक्तव्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. सोशल मीडियावर अँटिव्ह असणारी पायल आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे टीकेची धणी होत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. सती प्रथेचे समर्थन, नोबेल पुरस्कार विजेते मलाला यूसुफजाईला शिवीगाळ, वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीबद्दल प्रश्न विचारणे, अनुच्छेद ३७० बद्दल वादग्रस्त विधान करणे, फूड अ‍ॅप झोमाटोला धर्मनिरपेक्ष म्हणून संबोधणे अशा अनेक वादांमध्ये पायलचे नाव घेतले जाते.

- Advertisement -

पायलचे करियर 

पायलच्या करियरबद्दल बोलायचे झाल्यास, बॉलिवडमधील तिचे करिअर काही खास राहिली नाही. तिच्याअभिनयाची त्याला जास्त चर्चा झाली नाही. वो ये क्या हो रहा है, रिफ्यूजी, तुमसे मिलकर, रक्त, तौबा तौबा, ३६ चायना टाऊन, ढोल, अलगी और पगली, दिल कबड्डी सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली. याशिवाय तिने टेलिव्हिजनमध्येही काम केले आहे. तसेच ‘बिग बॉस’ मध्ये एंट्री घेतल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली. याबरोबर ‘फियर फॅक्टर इंडिया २’ मध्येही ती दिसली.. परंतु पायल नेहमी साइड रोलपर्यंतच मर्यादित राहिली.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -