घरमनोरंजनअभिनेत्री प्राची देसाईने केला नेपोटीजम बद्दल खुलासा म्हणाली ....

अभिनेत्री प्राची देसाईने केला नेपोटीजम बद्दल खुलासा म्हणाली ….

Subscribe

अभिनयाची सुरुवात छोट्या पडदयापासून केली होती २००६ साली 'कसम से' या लोकप्रिय हिंदी मालिकेमध्ये प्राची मुख्य भूमिकेमध्ये झळकली होती.

नेपोटीजम हा शब्द आता तुम्हा आम्हा सारख्या सामान्य मनसाला काही नवं राहिलं नाही. दररोज कोणी ना कोणी स्टार कीड हा बॉलिवूड मध्ये लॉंन्च होतो त्याचा अभिनय कितीही तुकार असला तरीही त्याच्या दारात सिनेमांची रांग लागते आणि दुसरीकडे मात्र नेपो किड्स मुळे हरहुन्नरी कलाकारांना डिवचलं जात. आता पुन्हा अशाच एका बॉलिवूड हिरोईन नेपोटीजमचा सामना गेले अनेक वर्ष करत आहे असा खुलासा केला आहे.अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री प्राची देसाई  बॉलिवूड मध्ये नेपोटीजमच्या दलदलीत सुद्धा आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. प्राचीने २००८ साली ‘रॉक ऑन’ या चित्रपटामधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केल होतं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच तिला बॉलिवूड मध्ये चांगलं काम मिळू शकलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Desai (@prachidesai)

- Advertisement -

चांगले चित्रपट न मिळण्यामागचा खुलासा आता प्राचीने एका मुलाखती दरम्यान केला आहे . मुलाखती दरम्यान प्राचीने आपल्या व्यक्तीगत आयुष्याबरोबरच आपल्या अभिनय क्षेत्राच्या करियर बद्दल सुद्धा भाष्य केल आहे. ” बॉलिवूड मध्ये चालणारे नेपोटीजम हे एक वास्तविक सत्य आहे याला कोणीही नाकारू शकत नाही . सगळ्यांनी याचा आता स्वीकार करायला हवा. नेपोटीजममुळे माझ्या करियर वर सुद्धा वाईट परिणाम झाला आहे. नेपोटीजमचे बॉलिवूड मध्ये वास्तव्य आहे,होते, आणि पुढेही कायम राहणार आहे. पण माला आता या गोष्टीचा अत्याधिक आनंद होत आहे की, प्रेक्षकांना आता सगळं सत्य कळलं आहे. यामुळे ते चांगलं आणि वाईट यामध्ये फरक करू शकतात. कोणता कलाकार योग्य आहे आणि कोणता अयोग्य यामधील अंतर आता प्रेक्षक समजू लागले आहेत. यामुळे प्रेक्षक ज्याला पसंत करतील तोच व्यक्ती आता पुढे जाऊ शकतो. यामुळे आता माझ्यासाठी परिस्थिती काहीशी बदलली आहे माला आता कामाच्या अश्या ऑफर येऊ लागल्या आहेत ज्या याआधी माझ्या वाटेला आतापर्यंत कधीच आलं नाही . आणि हे सगळं प्रेक्षकांमुळे शक्य होत आहे” या सर्वाचा आनंद देखील तिने मुलाखती दरम्यान व्यक्त केला. प्राचीने आपल्या अभिनयाची सुरुवात छोट्या पडदयापासून केली होती २००६ साली ‘कसम से’ या लोकप्रिय हिंदी मालिकेमध्ये प्राची मुख्य भूमिकेमध्ये झळकली होती.

- Advertisement -

हे हि वाचा – वरुणचे एक ट्विट, अन् ट्रोलिंग आर्मी सक्रीय

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -