अभिनेत्री पूर्वा शिंदे बोल्ड अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला

गाण्यातील पूर्वाच्या अदाकारीने चाहते पूर्णतः घायाळ होतील यांत शंकाच नाही.

actress purva shinde's bold look in prem majha Mouth Freshener song
अभिनेत्री पूर्वा शिंदे बोल्ड अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला

‘जीव माझा गुंतला’, ‘लागीर झालं जी’ या मालिकांमधून प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे कायमच तिच्या हटके आणि दमदार भूमिकेमुळे चर्चेत राहिली. तर अभिनेता, संगीतकार, गायक म्हणून वैभव लोंढेने नेहमीच वेगवेगळ्या गाण्यांमधून आपली जागा रसिक प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली. पूर्वा आणि वैभवची जोडी ‘प्रेम माझं माऊथफ्रेशनर’ या सॉंग मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रेयसी आणि प्रियकराच्या रोमँटिक नृत्याला ढिंच्याक गाण्याच्या साथीने या गाण्याचा जलवा सर्वांनाच घायाळ करणार आहे. या गाण्याचे संगीत, गीत, तसेच आपल्या दमदार आवाजात या गाण्याला वैभव लोंढे यांनी गायले आहे. तर निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव यांच्या पीबीए फिल्म्स अँड म्युझिक निर्मित हे गाणे रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे.

अभिनेत्री पूर्वाचा बोल्ड अंदाज या गाण्यात दिसून येणार आहे. या गाण्यातील पूर्वाच्या अदाकारीने चाहते पूर्णतः घायाळ होतील यांत शंकाच नाही. क्लासी ड्रेसमधील पूर्वाचा हॉटलूक आणि तिचा जबरदस्त डान्स प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना वेड लावणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. इतकेच नव्हे तर पूर्वाच्या जोडीला वैभवचा ढिंच्याक लूकही प्रेक्षकांच्या नजरा रोखून धरणारा आहे.

दमदार नृत्याच्या साथीने हे गाणे आज प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झाले आहे. पूर्वाच्या नृत्याविष्काराने या गाण्याची शोभा वाढविली असून या सॉंगचा जलवा नक्कीच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यांत शंकाच नाही.


हेही वाचा – Money Laundering Case : नोरा फतेही चौकशीसाठी ED कार्यालयात हजर, जॅकलीन फर्नांडिसला समन्स