राखी सावंत झाली चिंपांझी माकड, पाहा Video

What happened that actress Rakhi Sawant had to become ‘chimpanzee’
राखी सावंत झाली चिंपांझी माकड, पाहा Video

बॉलिवूडटची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. राखी अनेकदा तिच्या वागण्यामुळे किंवा विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. याच प्रसार माध्यमांसमोर वायफळ बडबडीमुळे देखील ती प्रकाश झोतात असते. आपल्या बिंधास्त बोल्ड अंदाजात राखी सावंत चाहत्यांना नेहमीत एंटटेन्ट करते. नुकताच राखीचा हटके, फनी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात राखी सावंत चिंपांझी माकड झाल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडूनही भन्नाट कमेंटस येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ राखीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यात राखी माकडाच्या वेशात वेडे चाळे करताना दिसतेय. तसेच भूक लागल्याचे म्हणत कोणाकडून तरी केळं मागून खाताना दिसतेय. राखी नुकतीच ‘बिग बॉस १५’ च्या ‘विकेंड का वार’ एपिसोडमध्ये झळकली होती. या एपिसोड पूर्वीचाच हा व्हिडिओ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी सावंतने ‘वीकेंड का वार’ या एपिसडमध्ये सलमान खानसह बिग बॉसच्या घरातील कंटेस्टेंट्ससह खूप मज्जा मस्ती करताना दिसली. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये राखी सावंत तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजामुळे ओळखली जाते. तसेच वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील ती चर्चेचा विषय असते. अनेक घटनांवर बिधास्त मत देत ती वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. मागील काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नाच्या विषयावरून चर्चेचा विषय ठरली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)


Dussehra 2021 : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा फुलल्या