Aryan Khanला सोडा, त्याच्यासोबत राजकारण केलं जातयं – रवीना टंडण भडकली

ड्रग्ज आणि वेश्या वृत्ती अद्याप संपणार नाही. त्यामुळे त्याला अपराध मानणे सोडून द्या. इथे कोणीही संत नाही

actress ravina tandon share tweet and say shameful Politics played with Aryan Khan
Aryan Khanला सोडा, त्याच्यासोबत राजकारण केलं जातयं - रवीना टंडण भडकली

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan)  ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आर्यनला सपोर्ट करण्यासाठी पुढे आलेत. रवीना टंडण हिने या प्रकरणात नाराजी व्यक्त केली असून आर्यन खानसोबत राजकारण केले जात असल्याचे तिने म्हटले आहे. रवीना टंडण हिने आर्यनाला सपोर्ट करणारी एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

रवीनाने तिच्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, ‘आर्यनसोबत लज्जास्पद राजकारण केले जात आहे. एका तरुण मुलाचे आयुष्य आणि भविष्याशी तुम्ही खेळत आहात. ही मन हेलावणारी बाब आहे’,असे रवीनाने म्हटले आहे.

तर अभिनेत्री सोमी अली हिने देखील आर्यनच्या अटकेवर नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, ‘कोणता मुलगा आहे ज्याने आतापर्यंत ड्रग्ज सोबत एक्सपिरिमेंट केले नाहीत. या मुलाला घरी जाऊ द्या. ड्रग्ज आणि वेश्या वृत्ती अद्याप संपणार नाही. त्यामुळे त्याला अपराध मानणे सोडून द्या. इथे कोणीही संत नाही’, असे म्हटले आहे. पुढे तिने ‘मी देखील १५ वर्षांची असताना गांजा ड्रग्ज ट्राय केले होते आणि आंदोलन सिनेमाच्या सेटवर देखील दिव्या भारती सोबत पुन्हा गांजा घेतला होता. मला त्याचा कोणताही पश्चाताप झालेला नाही’, असा खुलासा देखील केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

गौरीला लवकरचं बेस्ट Birthday Gift मिळेल – फराह खान

निर्माती फराह खान हिने देखील आर्यनच्या सुटकेसाठी प्रार्थना केली आहे. आर्यनची आई म्हणजेच गौरी खान हिचा वाढदिवस आहे आणि आजच आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होणार आहे. फराह खानने गौरी खानला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत फोटोसहित एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने गौरी तुला लवकरचं बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळेल असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फराह खानने लिहिले आहे की, ‘एका आईकडे असलेली शक्ती इतर कोणाकडेच नसते. आई वडिलांची पार्थना डोंगर देखील हलवू शकते समुद्राला देखील वेगळं करू शकते. सगळ्यात स्ट्राँग आई आणि स्ट्राँग व्यक्ती, मागच्या आठवड्यात तिला आपण सगळ्यांनी पाहिले आहे. गोरी तुला आज वाढदिवसानिमित्त सगळ्यात बेस्ट गिफ्ट मिळेल यासाठी मी प्रार्थना करत आहे.’


हेही वाचा – Gauri Khan Birthday:वाढदिवसानिमित्त सुहानाने शाहरुख – गौरीचे शेअर केले रोमँटिक फोटो