घरमनोरंजनअभिनेत्री सई ताम्हणकर हॉट सीटवर; पाहा कोण होणार करोडपतीचा विशेष भाग

अभिनेत्री सई ताम्हणकर हॉट सीटवर; पाहा कोण होणार करोडपतीचा विशेष भाग

Subscribe

या कार्यक्रमाच्या येत्या शनिवारच्या भागात 'प्रोजेक्ट बाला' संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर(sai tamhankar) 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहे. या दोघी नागपूर येथील ‘विमलाश्रम घरकुल' या संस्थेसाठी खेळणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’ मराठी(kon honar marathi karodpati marathi) हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. डुईवसागणिक या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत आहे. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना प्रेरणा मिळते. हीच संकल्पना घेऊन हा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमाच्या येत्या शनिवारच्या भागात ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर(sai tamhankar) ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहे. सईबरोबर सौम्या डाबरीवालही ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होणार आहेत. या दोघी नागपूर येथील ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत.

हे ही वाचा – सलमान खानची दाक्षिणात्य चित्रपटात एन्ट्री, चिरंजीवीसोबत ‘गॉडफादर’चा पहिला लूक रिलीज

- Advertisement -

‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही प्रत्येक आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे हजेरी लावतात. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत या भागांत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती(sudha murti), अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या दोघी नागपूर येथील वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुल’9vimalashram gharkul) या संस्थेसाठी खेळणार आहेत. १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहे. तर ‘प्रोजेक्ट बाला’ या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

- Advertisement -

हे ही वाचा – ‘कौन बनेगा करोडपती’: शो करण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली ‘ही’ अट

मूळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर(sai tamhankar) हिने तिच्या अभिनय कारकिर्दीचा एकूण प्रवास ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात उलगडला. ‘आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात’, असे मत सईने या कार्यक्रमात व्यक्त केले. वयाच्या १७ व्या वर्षी सईने काम करण्यास सुरुवात केली. सईचं सांगलीवरचं प्रेम, सांगलीच्या भाषेवर, लहेजावर असणारं प्रेम तिनी या भागात आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडण्यात आले. समाजकार्य आणि मनोरंजन क्षेत्र यांतले मोठं नाव असा मेळ असणारा, हा विशेष भाग निश्चितच रंगतदार ठरणार आहे. या कार्यक्रमाचा हा विशेषसा भाग शनिवारी रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – कोल्हापुरी चप्पल, हातात बांगड्या नि कानात झुमके; जान्हवी कपूरचा सिंपल लूक

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -