नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यानंतर समंथाने पुन्हा बदललं सोशल मीडियावरचं नाव!

नागा चैतन्य आणि समंथा

‘फॅमिली मॅन २’ (Family Man 2) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने (samantha ruth prabhu) पती आणि अभिनेता नागा चैतन्यासोबत (Naga Chaitanya) घटस्फोट घेतला आणि चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा ही तिचा पती नागा चैतन्यपासून वेगळे झाल्याची माहिती तिने शनिवारी सोशल मीडियावर दिली. नागापासून वेगळे झाल्यानंतर संमथाने सोशल मीडियावरचे नाव बदलल्याचे दिसतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील समंथाने सोशल मीडियावरील तिचे नाव बदलले होते. परंतु नागा आणि तिच्या दुराव्यातील बातम्या समोर येऊ लागल्याने चाहत्यांमधील चर्चाना उधाण आले होते, अखेर ते वेगळे झाले. नागापासून विभक्त झाल्यानंतर सामंताने आपले सोशल मीडियावरील नाव बदलून ‘समंथा प्रभू रुथ ऑफिशियल’ असे केले आहे.

अशी केली होती इंस्टावर पोस्ट

सामंथाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘खूप विचार केल्यानंतर मी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचे मार्ग वेगवेगळे आहेत. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्ही गेल्या एक दशकापासून चांगले मित्र आहोत. आता ही आम्ही एक चांगला बाँड शेअर करत आहोत. आम्ही आपल्या चाहत्यांना, शुभचिंतकांना आणि माध्यमांना आवाहन करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या प्रायव्हसीची काळजी घ्या. तुमच्या आधारासाठी धन्यवाद.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथा अक्किनेनीने सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. मात्र आता समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. यामुळेच तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. अखेर आता आपण वेगळं होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. समंथा अक्कीनेनी आणि नागार्जुगचा मुलगा नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये विवाह केला होता. दोघे २०१० मध्ये ये माया चेसावे चित्रपटात पहिल्यांदा एकाच पडद्यावर अभिनय करताना दिसले होते. या दोघांच्या जोडीला चाहत्यांना सर्वाधिक पसंती मिळत असून दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वात क्यूट जोडी मानली जायची. परंतु आता त्यांच्या वेगळे झाल्याच्या चर्चा रंगताना दिसताय.