अभिनेत्री सामंथाने सोशल मीडियावरुन हटवलं पतीचं अडनाव,पतीसोबत झाले भांडण?

Actress Samantha removes her husband's last name from social media
अभिनेत्री सामंथाने सोशल मीडियावरुन हटवलं पतीचं अडनाव,पतीसोबत झाले भांडण?

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni)सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आपल्या व्यवसायिक तसेच व्यक्तीगत जीवनातील घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सामंथाचे इंस्टाग्रामवर तब्बल 17.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करता.  सामंथाचं अपकमिंग प्रोजेक्ट असूदे किंवा एखादं फोटोशूट  चाहत्यांची तिच्यावर बारिक नजर असते. अशातच चाहत्यांना सामंथाच्या  सोशल मीडिया अकांउटच्या नावामध्ये काही बदल झालेला दिसून आला. यामुळे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. सामंथाने तिच्या नावपुढे असलेलं सासरचं अडनाव अक्किनेनी हटवलं असल्याचे दिसतेय.तसेच तिने फक्त एस(S) अश्याच शब्दाचा उल्लेख्ख केल्याने अनेकांनी तिच्यात आणि नागा चैतन्यमध्ये काही बिनसले असल्याचंं वक्तव्य केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी सामंथला कमेंट करत विचारलं आहे की नागा आणि तुझ्यात काही भांडण झाले आहे का? सर्वच चाहते सामंथाने केलेल्या नाव बदलावामुळे काहीसे चकीत झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@samantharuthprabhuoffl)

माहितीनुसार सामंथाने फक्त इंस्टाग्राम आणि ट्विटर अकांउटवरच नावत बदल केला आहे. तसेच तिच्या फेसबुक अकांऊटवर अद्याप सामंथा अक्किनेनी याचं नवाचा उल्लेख आहे. सामंथाने असं का केलं याचा खुलासा अद्याप तिने केला नाहीये. पण चाहत्यामध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.

2017 साली साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या मोठ्या मोलासोबत नागा चैतन्य सोबत सामंथाने लग्नगाठ बांधली.दोघेही अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. तसेच दोघांनाही साउथ इंडस्ट्रीमधील परफेक्ट कपल म्हणून संबोधले जाते. लग्नानंतर सामंथाने सर्व सोशल मीडिया आकाऊंटवर तिच्या नावपुढे सासरवाडीचे अडननाव अक्किनेनी अडनाव जोडले होते. पण आता सामंथाने अडनाव का हटवले आहे. असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.


हे हि वाचा – बातम्यांवर रोख लावणे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीवर गदा,शिल्पाची मागणी धोकादायक…हायकोर्ट