Viral Post: घटस्फोटनंतर सामंथा नागा चैतन्याला म्हणते, ‘मैं तुम्हारी हूं और तुम मेरे’!

actress samantha wrote last year on her third wedding anniversary with naga chaitanya
Viral Post: घटस्फोटनंतर सामंथा नागा चैतन्याला म्हणते, 'मैं तुम्हारी हूं और तुम मेरे'!

दाक्षिणात्य सुपरहिट जोडी सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य अक्किनेनी (Naga Chaitanya Akkineni) यांच्यात घटस्फोट झाल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी झाला. दोघांनी ३ ऑक्टोबरला सोशल मीडियावर घटस्फोटाबाबत जाहीर केले होते. सामंथा आणि नागाचे मार्ग आता वेगवेगळे झाले असून आता ते पती-पत्नी नाही आहेत. सामंथा आणि नागाच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आज जर दोघे एकत्र असते तर आज या दिवशी आपल्या लग्नाचा चौथ्या वाढदिवस साजरा करत असते. परंतु नशीबात काहीतरी वेगळेच लिहिले होते.

जरी सामंथा आणि नागाचे नाते तुटले असले तरी त्याच्या प्रेमाच्या काही निशाण अजूनही आहेत. त्यांच्या आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. सामंथाने याच दिवशी एका वर्षापूर्वी तिसऱ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट लिहिली होती. यादरम्यान सामंथाने नागा चैतन्यासोबत एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये दोघे खूप सुंदर दिसत होते. दोघांनीही ट्रेडिशनल कपडे घातले होते. हा फोटो तस्वीर राणा दग्गुबतीच्या लग्नात काढला होता. सामंथाने हा फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘तू माझा आहेस आणि मी तुझी. आपण कोणत्याही दरवाज्या जवळ पोहोचू, तेव्हा आपण नेहमी एकत्र खोलू. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

सामंथाची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहते आता सामंथा आणि चैतन्य पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान घटस्फोटसंदर्भात सामंथाने पोस्ट लिहून सांगितले होते की, ‘खूप विचार केल्यानंतर मी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचे मार्ग वेगवेगळे आहेत. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्ही गेल्या एक दशकापासून चांगले मित्र आहोत. आता ही आम्ही एक चांगला बाँड शेअर करत आहोत. आम्ही आपल्या चाहत्यांना, शुभचिंतकांना आणि माध्यमांना आवाहन करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या प्रायव्हसीची काळजी घ्या. तुमच्या आधारासाठी धन्यवाद.’


हेही वाचा – कंगनाने १० दिवसांत ५ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या Diet Plan