CoronaVirus: ‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, व्हिडीओ कॉलद्वारे घेतलं शेवटचं दर्शन

actress sana saeed father death on janta curfew actress had to attend his funeral on video call
CoronaVirus: 'या' अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, व्हिडीओ कॉलद्वारे घेतलं शेवटचं दर्शन

कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्यास सांगितलं होत. कोणी घरा बाहेर पडू नये अशी विनंती केली होती. पण त्याच दिवशी ‘कुछ कुछ होता है’ मधील अभिनेत्री सना सईद हिच्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे जनता कर्फ्यूचे पालन करून व्हिडीओ कॉलद्वारे ती अंत्यसंस्कारात सहभागी झाली होती. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला. तिने सांगितलं की, ती त्या दिवसात लॉस एंजेलिसामधील कार्यक्रमासाठी गेली होती. परंतु प्रवास करणाऱ्यावर निर्बंध घातल्यामुळे ती तेथून परत येऊ शकली नाही.

याबाबत बोलताना ती पुढे म्हणाली की, माझ्यासाठी ही गोष्ट सहन करणे खूप कठीण होते. या अगोदर मी आयसोलेशनमध्ये होते आणि माझ्यासोबत कोणीच नव्हते. हे माझ्यासाठी फार कठीण आणि खूप वाईट होत. मागील काही महिन्यात ते आजारी पडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती आणि ते घरी परतले होते. अन्यथा मी त्यांना सोडले नसते. मी शेवटच्या महिन्यात कोणते काम घेतले नव्हते, कारण मला वडिलांसोबत राहायचे होते.

तिच्या वडिलांना मधुमेह होता, असं सना म्हणाली. त्या परिस्थितीतील पुढच्या गोष्टी बद्दल तिने सांगितलं की, मी काही दिवस जगापासून स्वतःला दूर ठेवले होते आणि फक्त आपल्या कुटुंबासोबत होते. मला त्यांच्यासोबत राहायचे होते आणि मला त्यांना मिठीत घ्यायचे होते. मी संपूर्ण वेळ निराश असायची. मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करत होते. पण माझ्या वडिलांच्या मी अंत्यसंस्कारला उपस्थित राहू शकली नाही. मी अशा परिस्थितीत शांततेत काम करण्याचा विचार केला.


हेही वाचा – ‘ओ करोना कभी मत आना’ मुंबई पोलिसांच्या ट्विटवर श्रद्धाचा भन्नाट रिप्लाय