‘आता जनताच…’ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अभिनेत्री सीमी गरेवाल यांचं ट्वीट चर्चेत

सीमी ग्रेवाल म्हणाल्या, असं दिसते की राजीनामे जरी सन्माननीय आणि तत्त्वनिष्ठ असले तरी राजकारणात नेहमीच विवेकपूर्ण नसतात. आता हे महाराष्ट्रातील जनतेवर अवलंबून आहे की कोणाला मतदान करायचं, असं म्हणत त्यांनी थेट आपली बाजू मांडली आहे.

Actress Seemi Garewal s tweet is in discussion after the Supreme Court's decision
Actress Seemi Garewal s tweet is in discussion after the Supreme Court's decision

राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय काल, 11 मे ला पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला. यावेळी न्यायालयाने राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचं सांगितलं. तसंच, सराकरावरही ताशेरे ओढले. परंतु, राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी शिंदेंना बोलावले आणि जे सरकार स्थापन झालं हे कायदेशीर आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानंतर राज्यात शिंदे- फडणवीस सरकार कायम राहिलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिंदे आणि ठाकरे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री सीमी गरेवाल यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ( Actress Seemi Garewal s tweet is in discussion after the Supreme Court’s decision )

सीमी गरेवाल यांचं ट्वीट काय?

सीमी गरेवाल म्हणाल्या, असं दिसते की राजीनामे जरी सन्माननीय आणि तत्त्वनिष्ठ असले तरी राजकारणात नेहमीच विवेकपूर्ण नसतात. आता हे महाराष्ट्रातील जनतेवर अवलंबून आहे की कोणाला मतदान करायचं, असं म्हणत त्यांनी थेट आपली बाजू मांडली आहे.

आदित्य ठाकरेंच्या पोस्टवरही केली होती कमेंट

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट करत शिंदे- फडणवीस सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, असंविधानिक, बेकायदा आणि अनैतिक. आजच्या निकालानंतर मिंधे भाजप सरकारकडे बघण्याचा हा एकचा मार्ग आहे. आदित्य यांच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया देत शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्यात अभिनेत्री सीमी गरेवाल यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सीमी गरेवाल यांनी लिहिलं की, काळजीचं कारण नाही, आता पुढील जबाबदरी आपल्यावर आहे, महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीरव केलेला हा बेकायदेशीर कब्जा नक्कीच हटवले, त्यांनी थेट कमेंट करत शिंदे सरकारला पाडण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

( हेही वाचा: परिणीतीच्या मुंबईतील निवासस्थानी रोषणाई; उद्या होणार एंगेजमेंट )

राऊतांचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्पष्ट आहे. ज्याला कायदा कळतो त्याला तो कळला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करण्यात येत आहेे. ज्या पद्धतीने भाजप किंवा शिंदे गटाचे लोक एकमेकांना पेढे भरवताय, फटाके वाजवताय, नाशिकचे खासदार नाचत होते. ते पुर्णपणे चुकीचे आहे. कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नागडे केले आहे, ते नागडे नाचत होते, हा नागड्यांचा नाच होता. ते लोकशाहीच्या छाताडावर नागडे नाचताय, नाचणार्‍यांच्या अंगावर न्यायालयाने एकही वस्त्र ठेवले नाही, अंतर्वस्त्रसुध्दा नाही. न्यायालयाने शिंदे गटाला नागडे करुन विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले, जनता तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दांत शिवसेनेचे (उठाबा) नेते संजय राउत यांनी शिंदे, फडणवीस सरकार नाशकात जोरदार हल्लाबोल केला.