अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि नोरा फतेही कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला असून बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात आले आहे

Actress Shilpa Shirodkar and Nora Fatehi corona positive
Actress Shilpa Shirodkar and Nora Fatehi corona positive

बॉलिवूड कलारांच्या पार्ट्या त्यांना चांगल्याच भोवल्या असून आता अभिनेत्री करिनानंतर अभिनेत्री नोरा फतेही आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी करिनासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.  बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला असून बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात आले आहे.

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री होती जिचे पहिल्यांदा लसीकरण पूर्ण झाले. जानेवारी महिन्यात शिल्पाने पहिली कोरोना विरोधी लस घेतली होती. शिल्पाने इन्स्टाग्रामर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. चार दिवसांपूर्वी शिल्पाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये सर्वांना कोरोना विरोधी लस घेण्याचे आवाहन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shirodkar (@shilpashirodkar73)

 

शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘सर्वांनी सुरक्षित रहा. कोरोना विरोधी लस घ्या आणि नियमांचे पालन करा. आपल्यासाठी चांगल्या असलेल्या गोष्टी सरकार करत आहे’, असे शिल्पाने म्हटले आहे.

अभिनेत्री नोरा फतेही देखील इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ती पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. नोराने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘दुर्देवाने मला कोरोनाची लागण झाली आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे. मी सध्या पूर्णपणे बेड वर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. सर्वांनी सुरक्षित रहा. मास्क घाला. कोरोना फार जलद गतीने पसरत आहे. माझ्या तब्येतील सुधारणा होत आहे. आपल्या आरोग्याशिवाय महत्त्वाचे काहीच नाही त्यामुळे सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा’.

२८ डिसेंबरला नोराला कोरोनाची लागण झाली आहे.ती सध्या होम क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. दरम्यान नोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात नोराची प्रकृती फार वाईट झाल्याचे दिसत होते. मात्र नोराचे हे फोटो फार जुने असल्याचे सांगण्यात आले आहे. या फोटोंकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – कोरोनालाही करिना आवरेना, रिपोर्ट निगेटीव्ह येताच बेबोच्या पार्ट्या सुरू