‘कुसुम’ मालिकेतून अभिनेत्री शिवानी बावकरची पुन्हा छोट्या पडद्यावर एंट्री

'कुसुम' ही मालिका सोनी हिंदी वाहिनीवरील 'कुसुम' या मालिकेचा रिमेक आहे.

सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ (Kusum) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर Shivani Baokar) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली पोहचली होती. सासर आणि महेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी आता दिसणार आहे. शिवानीच्या नव्या मालिकेसाठी प्रेक्षकही उत्सुक असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar)

लोकलमध्ये तिची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा ‘बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे’, असं सांगते. त्यावर ‘अजूनही तूच करतेस त्या घरचं?’ असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का? ‘सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली वाटते. एका वेगळ्या आशयाची  ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवानीच्या कुसुम या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना जुनी हिंदी मालिका कुसुमची आठवण झाली असेल. ‘कुसुम’ ही मालिका सोनी हिंदी वाहिनीवरील ‘कुसुम’ या मालिकेचा रिमेक आहे. निर्माती एकता कपूर हिने या मालिकेची निर्मिती करत आहे. अनेक वर्षांनी एकता कपूर पुन्हा एकदा मराठी मालिकेची निर्मिती करणार आहे त्यामुळे प्रेक्षक या मालिकेसाठी उत्सुक असल्याचे दिसून आले आहे.


हेही वाचा – बीग बींच्या नातवाची झाली बॉलिवूडमध्ये एंट्री, झोया अख्तर सोबत करणार काम