घरमनोरंजनअभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली विवाहबंधनात; लग्नाच्या फोटोंनी वेधलं लक्ष

अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली विवाहबंधनात; लग्नाच्या फोटोंनी वेधलं लक्ष

Subscribe

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे नुकतेच विवाहबंधनात अडकले. हे दोघेही मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दरम्यान, 31 जानेवारी रोजी सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत अजिंक्य-शिवानीने त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला होता. त्यानंतर गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी हे विवाहबंधनात अडकले. शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी उपस्थित होते. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुलाबी लेहंग्यात सजली शिवानी

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve)

शिवानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवानीने पेस्टल गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा घातला होता, तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. तसेच गळ्यात गुलाबी आणि पांढऱ्या फुलांची सुंदर वरमाला घातली होती. शिवानीने या फोटोंना “आज दोन तारे एकत्र आले” असं कॅप्शन दिलं आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून चाहते यावर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -
अनेक मालिका, चित्रपटांमध्ये केलंय शिवानीने काम

Preview

 

- Advertisement -

शिवानी सुर्वे ‘देवयानी’ या मालिकेपासून चर्चेत आली. त्यानंतर तिने ‘जाना ना दिल से दूर’ या हिंदी मालिकेतही मुख्य भूमिका साकारली होती. तसेच ट्रिपल सीट, झिम्मा 2, सातारचा सलमान, वाळवी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या अजिंक्य आणि शिवानीची पहिल्यांदा ओळख झाली होती. सुरुवातील मालिकेच्या सेटवर एकत्र काम करताना ते दोघे चांगले मित्र बनले. हळू हळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मागील 9 वर्षापासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

 


हेही वाचा : आपल्या देशात लोकशाही आहे का?… – ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा सवाल !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -