घरमनोरंजनअभिनेत्री श्रेया बुगडेचा इंडो - वेस्टर्न साडीमधला खास लुक

अभिनेत्री श्रेया बुगडेचा इंडो – वेस्टर्न साडीमधला खास लुक

Subscribe

नुकतंच श्रेया बुगडेने तीच छान फोटोशूट केलं आहे. तिचा हा खास लुक सोशल मीडियावरून शेअर केला आहे. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

चला हवा येऊ द्या (chala hava yeu dya) या कार्यक्रमामधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे (shreya bugde) हीने तिच्या दमदार अभिनयाने आणि उत्तम विनोदाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे. ‘विनोदाची राणी’ अशी श्रेयाची प्रेक्षकांमध्ये ओळख आहे. श्रेया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. श्रेया तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट वर सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत असतात. संपूर्ण महाराष्ट्राचीच श्रेया लाडकी बनली आहे. त्याचबरोबर श्रेया सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांसोबत सतत कनेक्टेड असते. तिच्या चाहत्यांना सुद्धा तिच्या नव्या कामाविषयी आणि नव्या प्रोजेक्टविषयी किंवा तिच्या ट्रिपविषयी जाणून घ्यायला आवडतं. श्रेयाला पडद्यावर परफ़ॉर्मन्स करत असताना पाहणं चाहत्यांना नेहमीच आवडतं. उत्तम अभिनयाबरोबरच श्रेया खूप सुंदर सुद्धा दिसते.

हेही वाचा – गोव्याच्या किनाऱ्यावर श्रेया करते धमाल

- Advertisement -

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

- Advertisement -

नुकतंच श्रेया बुगडेने तिचं छान फोटोशूट केलं आहे. तिचा हा खास लुक सोशल मीडियावरून शेअर केला आहे. ज्यात ती काळ्या रंगाच्या इंडो – वेस्टर्न साडीमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. श्रेयाने (shreya bugde) या साडीवर जी ज्वेलरी घातली आहेत त्याने तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. श्रेया नेहमीच तिच्या नव-नवीन लुकचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, पण तिचा हा काळ्या रंगातील साडीमधला लुक विशेष आहे. सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांकडून तिच्या या फोटोवर आणि नव्या लुकवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने सुरु आहे. या कार्यक्रमामध्येही श्रेयाचे विविध लुक प्रेक्षकांना पहायला मिळत असतात. श्रेयाने तिच्या अभिनयाने आणि विनोद बुद्धीने अनेक चाहत्यांच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. श्रेयाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात स्वतःच्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

 

चला हवा येऊ द्या (chala hava yeu dya) या कार्यक्रमात श्रेयाने आत्ता पर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने साकारलेली प्रेत्येक भूमिका प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडली. श्रेयाचे चाहते नेहमीच तिच्या विविध भूमिकांचा कौतुक करत असतात. आणि विशेष बाब म्हणेज चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सर्व पुरुष कलाकारांमध्ये श्रेया एकमेव माहीला कलाकार असून ती तिच्या वाट्याला आलेल्या सर्वच भूमिका उत्तम पणे साकारते. श्रेयाच्या अभिनयासाठी नेहमीच श्रेयाचं (shreya bugde) कौतुक होत असतं त्याप्रमाणे तिच्या सौंदर्याचेही कौतुक होत असते. आणि आत्ताच श्रेया बुगडेचं काळ्या इंडो – वेस्टर्न साडी मधलं हे नवं फोटोशूट आणि तिचा हा नवा लुक सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. श्रेयाचे चाहते सुद्धा तिच्या या लुक वर खूप छान प्रतिक्रिया देत आहेत.

 


 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -