मूनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘आरसा’ लघुपटासाठी अभिनेत्री श्वेता पगारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

श्वेता यांनी कॅन्सर झालेल्या आईच्या मुलीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे या लघुपटाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे.

नुकत्यात संपन्न झालेल्या चौथ्या मूनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार श्वेता पगार यांना जाहीर झाला आहे.अशी माहिती फेस्टिवलचे आयोजक देवाशीष सरगम यांनी दिली. गणेश मोडक दिग्दर्शित व आशिष निनगुरकर लिखित “आरसा” (द स्टेटस) या शॉर्टफिल्मला चौथ्या मूनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- श्वेता पगार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- संकेत कश्यप,सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- वैष्णवी वेळापुरे,सर्वोत्कृष्ट लेखक- आशिष निनगुरकर व सर्वोत्कृष्ट लघुपट- आरसा द स्टेटस…अशी एकूण पाच नामांकने मिळाली होती.त्यापैकी श्वेता पगार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब जाहीर झाला आहे. श्वेता यांनी कॅन्सर झालेल्या आईच्या मुलीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे या लघुपटाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे.

“आरसा” हा लघुपट कॅन्सर रोगाबद्दल जनजागृती करणारा आहे. या लघुपटात कॅन्सर झालेल्या रुग्णांसाठी काय-काय मदत करता येऊ शकते याचा अनमोल संदेश दिला आहे.या रोगाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत.या लघुपटाचे दिग्दर्शन गणेश मोडक यांनी केले असून संकलन हर्षद वैती यांचे आहे. छायांकन योगेश अंधारे यांचे असून या लघुपटात ‘जजमेंट अणि श्री पार्टनर’ या चित्रपटांमधून झळकलेल्या नायिका श्वेता पगार यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच श्वेता यांच्यासोबत संकेत कश्यप,वैष्णवी वेळापुरे,गीतांजली कांबळी व डॉ. स्मिता कासार यांनी या लघुपटात भूमिका केल्या आहेत. काव्या ड्रीम मूव्हीज व किरण निनगुरकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.

चौथ्या मुनव्हाइट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘आरसा’ (द स्टेटस) या लघुपटाची विशेष नोंद घेण्यात आली आहे.या लघुपटासाठी निर्मिती व्यवस्थापक म्हणून प्रतिश सोनवणे, स्वप्निल निंबाळकर, सिद्धेश दळवी, प्रदीप कडू,अभिषेक लगस, सुनील जाधव,अजित पवार यांनी काम केले आहे. या लघुपटाचे सहनिर्माते अशोक कुंदप व आशा कुंदप हे आहेत.हेमंत कासार,वैभव वेळापुरे, विजय पालकर,सचिन खुटाळे व रश्मी हेडे आदींनी या लघुपटासाठी सहकार्य केले आहे.याअगोदर या लघुपटाने विविध फिल्म फेस्टिवलमध्ये बाजी मारली आहे.आता या पुरस्काराबद्दल श्वेता पगार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


हेही वाचा – ‘वन फोर थ्री’च्या पोस्टरचे दगडूशेठ हलवाईच्या चरणी अनावरण