घरताज्या घडामोडीVideo: 'मेरी ब्रा का साइज...' Shweta Tiwari बोल्ड कमेंटमुळे चर्चेत, वेबसिरीज...

Video: ‘मेरी ब्रा का साइज…’ Shweta Tiwari बोल्ड कमेंटमुळे चर्चेत, वेबसिरीज प्रमोशनमध्ये वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

श्वेता तिवारीच्या आगामी वेबसिरीजचे शुटींग सध्या मध्यप्रदेशातील भोपाळ येथे सुरू आहे. बुधवारी भोपाळच्या जेहन नुमा हॉटेलमध्ये वेबसिरीजच्या संपूर्ण टीमने प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी श्वेताने गंमतीत हे विधान केले. त्यानंतर अनेकांनी या वादग्रस्त विधानावर आक्षेप नोंदवला. श्वेताच्या या वादग्रस्त विधानानंतर मध्य प्रदेशातील हिंदू संघटनेने नाराजी व्यक्त केली.

हिंदी टेलिव्हिजन आणि बिग बॉस 4 ची (Bigg Boss 4) विजेती श्वेता तिवारी ( Shweta Tiwari ) तिच्या हॉट फोटोशूटमुळे सतत चर्चेत असतेच मात्र यावेळी श्वेता तिवारी तिच्या वादग्रस्त वक्यव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. (Shweta Tiwari Controversial statement)  भोपाळमध्ये एका वेबसिरिजच्या प्रोमोशनमध्ये श्वेता तिवारीने  स्रियांच्या आंतरवस्त्रांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. तिच्या या विधानाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून श्वेताच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवण्यात येत आहे.इ

श्वेता तिवारी तिच्या आगामी वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी भोपाळमध्ये गेली होती. यावेळी वेबसिरीजची संपूर्ण टीम त्याठिकाणी उपस्थित होती. त्यावेळी मुलाखतीत गमतीशीर प्रश्नांची उत्तरे देताना श्वेताने ‘मेरी ब्रा का साइज भगवान भी ले रहे है!’, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य श्वेताने गंमतीत केलेले असले तरी यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी श्वेता तिवारीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

श्वेता तिवारीच्या आगामी वेबसिरीजचे शुटींग सध्या मध्यप्रदेशातील भोपाळ येथे सुरू आहे. बुधवारी भोपाळच्या जेहन नुमा हॉटेलमध्ये वेबसिरीजच्या संपूर्ण टीमने प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी श्वेताने गंमतीत हे विधान केले. त्यानंतर अनेकांनी या वादग्रस्त विधानावर आक्षेप नोंदवला. श्वेताच्या या वादग्रस्त विधानानंतर मध्य प्रदेशातील हिंदू संघटनेने नाराजी व्यक्त केली असून श्वेता तिवारीच्या या वक्तव्याचा विरोध केला जावा आणि जे कलाकार देवाविषयी इतक्या खालच्या पातळीला येऊन बोलत असतील अशा कलारांना इथे शुटींग करण्यात परवानगी देऊ नका असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे श्वेता तिवारीने गंमतीत केलेले हे विधान तिच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

श्वेता तिवारी हिंदी टेलिव्हीजनवरील ओळखीचा चेहरा आहे. बिग बॉस 4 ची महाविजेती होती. अनेक मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केले असून प्रेक्षकांनी तिला प्रचंड प्रेम दिले आहे. श्वेता तिवारी कायम तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चेत राहिली आहे. श्वेताने दोन लग्न केली असून तिची दोन्ही लग्न मोडली आहेत. श्वेताची मुलगी पलक तिवारी देखील सध्या चर्चेत असून अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत ती डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.


हेही वाचा – Alka Kubal Daughter Wedding: अलका कुबल यांची ‘पायलट’ लेक चालली सासरला, पाहा इशानीच्या लग्नाचे फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -