सोनालीच्या मनमोहक अदा, साडी आणि नथीवरचे फोटो पाहून चाहते घायाळ

नुकताच सोनालीने एक घायाळ करणारा लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

——————————————————————————–
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(sonalee kulkarani) हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकताच सोनालीने एक घायाळ करणारा लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हे ही वाचा – ‘जिवाभावाची साथ लाभली ती म्हणजे सलमान भाऊ यांची’, अभिनेता रितेश देशमुखचं दिग्दर्शनात…

सोनालीने पांढऱ्या आणि लाल रंगाची काठाची साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि साडीच्या पदरावर वारी लिहिलेली अक्षरे असा सोनलीचा सुंदर लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर सुद्धा चाहत्यांचा खूप छान प्रतिसाद तिला मिळतो आहे. सोनालीने चित्रपटांमधून भुमिका करत स्वतःचा चाहता वर्ग तयार केला आहे. सोनालीचे नवीन फोटो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोनाली मॉर्डन लूक मध्ये जितकी छान दिसते तेवढीच तो साडी मधल्या परंपरिक लूक मध्ये सुद्धा दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीचा साडीमधला हा खास लूक पाहून चाहते सुद्धा घायाळ झाले आहेत. या संदर्भतील एक पोस्ट सुद्धा सोनालीने शेअर केली आहे. दरम्यान सोनाली कुलकर्णीचा लामासह लाईव्ह(lamasha live) हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत , सचित पाटील, सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. प्रेक्षस सुद्धा या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे ही वाचा –  ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,’ लहानग्या परीचा आषाढी एकादशी निमित्त खास व्हिडीओ