घरमनोरंजनअभिनय,कवयित्री,निवेदनाबरोबर आणखी 'हा' एक गुण आहे स्पृहाच्या अंगी!

अभिनय,कवयित्री,निवेदनाबरोबर आणखी ‘हा’ एक गुण आहे स्पृहाच्या अंगी!

Subscribe

रंगबाजच्या युनिटमधल्या शाकाहारींनी स्पृहाच्या हातच्या चविष्ट भेंडीच्या भाजीवर ताव मारला. तर मांसाहारी मंडळींनी चिकन करी फस्त केली. आपल्या हातचे जेवण सगळ्यांना आवडल्याचे दिसल्यावर स्पृहाचाही चेहरा फुलला.

अभिनेत्री स्पृहा जोशी गेले काही दिवस आपल्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त होती. रंगबाज या स्पृहाच्या नव्या वेबसीरिजचे चित्रीकरण मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि चंदेरीमध्ये झाले आहे. रंगबाजच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्पृहाने सर्वांसाठी मस्त मेजवानीचा घाट घातला.

View this post on Instagram

कल ' रंगबाझ ' की शूटिंग का मेरा आखरी दिन था.. इन बस कुछ ही दिनों में इस प्यारीसी टीम के साथ एक लगाव सा होगया है.. यहाँ से मुंबई वापस जाने से पहले सोचा इन सब के लिये कुछ स्पेशल करूं.. तो यहाँ चंदेरी के होटेल ' कीला कोठी ' के किचन पर कब्जा़ करलिया.. पूरे स्टाफने बहोत ज्यादा मदद की.. बेहद खुशी है की जितना मजा़ मुझे खाना पकानेमें आया.. सबने बडे़ प्यारसे खाया और नवाजा़ भी.. बस! खाना बनते बनते मेरा दिन भी बन‌ गया! ?? @rangbaazzee5 @zee5premium @jimmysheirgill @officialsushantsingh @sachin_yo @sid_mish @nirajrsharma @shortboxbeardo @rahulwafare10 @sidmufc93 @pritesh_shanbhag @psykriiii @poojamohapatra @shravani

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

- Advertisement -

मध्यप्रदेशच्या चंदेरीमध्ये रंगबाजची टीम राहत असलेल्या किला कोठी हॉटेलमध्येच स्पृहाने सर्वांसाठी फक्कड जेवण बनवले. चिकन करी आणि मस्त भेंडीच्या भाजीचा घाट घातला. रंगबाजच्या युनिटमधल्या शाकाहारींनी स्पृहाच्या हातच्या चविष्ट भेंडीच्या भाजीवर ताव मारला. तर मांसाहारी मंडळींनी चिकन करी फस्त केली. आपल्या हातचे जेवण सगळ्यांना आवडल्याचे दिसल्यावर स्पृहाचाही चेहरा फुलला.

- Advertisement -

अभिनेत्री स्पृहा जोशी सांगते, “गेले कित्येक महिने आम्ही रंगबाजसाठी मेहनत घेत होतो. या काळात एकमेकांसोबत भोपाळ, चंदेरी आणि मध्यप्रदेशच्या इतर भागांमध्ये चित्रीकरणा दरम्यान आम्ही सर्वच कलाकारांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. त्यामुळे सर्वांसोबतच माझे जिव्हाळ्याचे संबंध झाले. या सर्वांसाठी काहीतरी स्पेशल करावंस वाटलं. त्यामुळेच चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी माझ्या हातचं काहीतरी सर्वांना बनवून खायला घालावं, असं मनातं आलं. आणि मग शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा मी घाट घातला. मला सर्वांसाठी प्रेमाने जेवण बनवायचा जेवढा आनंद झाला. त्यापेक्षा जास्त आनंद सर्वजण पोटभर जेवून, तृप्त झाल्यावर वाटला.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -