Swara Bahskar: अभिनेत्री स्वरा भास्कर होणार आई, म्हणाली मुलासाठी अजून थांबू शकत नाही

स्वराने आई होण्यासाठी अडोप्शन म्हणजेच मुल दत्तक घेण्याचा मार्ग निवडला

Actress Swara Bhaskar going to be a mother
Swara Bahskar: अभिनेत्री स्वरा भास्कर होणार आई, म्हणाली मुलासाठी अजून नाही थांबू शकत नाही

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमची चर्चेत असते. तिच्या समाजिक , राजकीय वक्तव्यांमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. बेधडक स्वभाव आणि कामामुळे स्वरा भास्करचा वेगळा चाहता वर्ग आहे. मात्र याच स्वरा भास्करला आता आई होण्याचे वेध लागले आहेत. अभिनेत्री स्वरा लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावरुन स्वरा ही बातमी सर्वांना दिली आहे. स्वराचे लग्न झालेले नाही मग स्वरा आई कशी होणार असा प्रश्न सर्वांना पडला. स्वराने आई होण्यासाठी अडोप्शन म्हणजेच मुल दत्तक घेण्याचा मार्ग निवडला आहे. स्वरा दोन मुले दत्तक घेणार आहे. मुले दत्तक घेण्यासाठी स्वराने तिचे नाव सेंट्रल एडॉप्शन रिसोर्स अँथोरिटीमध्ये रजिस्टर केले आहे. स्वरा सध्या मुल दत्तक घेण्यासाठी वेटींग लिस्टवर आहे.

स्वराने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मला मुल दत्तक घ्यायचे होते. अनेक दिवस विचार केल्यानंतर स्वराने शेवटी मुले दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. स्वरा पुढे म्हणाली की मला नेहमी वाटत होते की माझा परिवार आणि मुले असावीत म्हणून मी मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दत्तक हा एकच मार्ग आहे जो मला हवे ते सगळं मिळवून देईल.

स्वराने मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेण्याआधी ती अशा पालकांना भेटली ज्यांनी मुले दत्तक घेतली आहेत आणि ते त्यांचे सध्या पालन पोषण करत आहेत. त्यांच्याशी तिने संवाद साधला त्याचे अनुभव ऐकले. मुलं दत्तक घेण्याची संपूर्ण प्रोसेस त्याचप्रमाणे त्यांचे संगोपन करण्याची माहिती घेतली.

स्वराच्या या निर्णयावर स्वराच्या संपूर्ण कुटुंबाने तिला यासाठी पाठिंबा दिला. त्यांच्या सपोर्टमुळेच मी मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेऊ शकले. आता मला आई व्हायचे आहे आणि त्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही असे स्वराने म्हटले आहे.


हेही वाचा – बॉलिवूड गायिका श्रद्धा पंडितला धमकी, ओशिवरा पोलीसात तक्रार दाखल