कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वात अभिनेत्री तनुजा, काजोलची उपस्थिती

कोण होणार मराठी करोडपती या कार्यक्रमाचं नवीन पर्व ६ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्क्रमाच्या माध्यमातून सामान्य माणसाला स्वतःच्या ज्ञानाची चुणूक दाखवता येते आणि स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर करोडपती बनण्याची संधी मिळते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कोण होणार करोडपती (kon honaar crorepati) हा मराठी कार्यक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. हा बहुचर्चित कार्यक्रम ६ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य माणसाला स्वतःच्या ज्ञानाची चुणूक दाखवता येते आणि स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर करोडपती बनण्याची संधी मिळते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाच्या मागच्या काही पर्वांमध्ये सुद्धा मोठया प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. आणि त्यांनीही भरघोस बक्षिसाची रक्कम मिळवली आहे. आगामी पर्वात सुद्धा महाराष्ट्रामधून अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत.

कोण होईल करोडपती हा कार्यक्रम महाराष्ट्रातील घराघरात पाहिला जातो. ‘आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’. या कार्यक्रमाच्या आगामी पर्वाचं हे ब्रीदवाक्य आहे. कोण होणार करोडपती (kon honaar crorepati) या कार्यक्रमाच्या येणाऱ्या नव्या पर्वात जेष्ठ अभिनेत्री तनुजा आणि त्यांची मुलगी अभिनेत्री काजोल त्याचबरोबर प्रसिद्ध लेखिका सुद्धा मूर्ती यांसारखे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सामान्य माणसाने आपल्या बुद्धी आणि ज्ञानाच्या बळावर कार्यक्रमामधून मोठ्या प्रमाणावर बक्षिसाची रक्कम जिंकून स्वतःची स्पप्न पूर्ण करावीत हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Khedekar (@sachinskhedekar)

कोण होणार करोडपती (kon honaar crorepati) च्या आधीच्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता स्वप्नील जोशी, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले होते. तर नवीन पर्वाचं सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर (sachin khedekar) करणार आहेत. सचिन खेडेकर यांची बोलण्याची उत्तम शैली, ओघवती भाषा यामुळे त्याचे सूत्रसंचालन हा सुद्धा या कार्यक्रमाचा एक मुख्य घटक आहे. या आगामी पर्वात बहुमताचा कौल, बदली प्रश्न, व्हिडिओ ऑफ फ्रेंड या ३ लाईफ लाईन सुद्धा  असणार आहेत.

या कार्यक्रमाची घोषणा झाली तेव्हा आणि कार्यक्रमाचं पोस्टर आऊट झालं तेव्हा प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हा कार्यक्रम ६ जून पासून टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून ६ लाखांपेक्षा अधिक नोंदणी  करण्यात आली आहेत. दिवसागणिक र्यक्रमाची लोकप्रियता वाढत चालली आहे. प्रेक्षकांच्या ज्ञानवृद्धी बरोबरच मनोरंजन करण्याचाही प्रयत्न केला जातो. त्याच बरोबर समाज कल्याणासाठी आजवर ज्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे अशा सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला होणार आहे. तसेच ते करत असलेल्या कामाबद्दलही माहिती जाणून घेतली जाणार आहे. हा विशेष भाग दर शनिवारी पाहायला मिळणार आहे.  आधीच्या पर्वात नाना पाटेकर (nana patekatr), आनंद शिंदे, मनोज वाजपेयी, मेधा पाटकर (medha patkar), सयाजी शिंदे (sayaji shinde), सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) या मंडळींनी सहभाग घेतला होता.

आताच्याही पर्वात विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या व्यक्तींना बोलविण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सुद्धा रंजक होणार आहे. या कार्यक्रमात १८ वर्षांची एक तरुणी आणि ७० वर्षांची एक व्यक्ती सुद्धा सहभागी होणार आहे. पण ते कोण असणार आहेत ते येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर महिला बस चालक, पोलीस उपनिरीक्षक, MPSC किंवा UPSC मध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी सुद्धा सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर आर्मी ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर आणि त रेडिओ अनाऊंसर सुद्धा सहभागी होतील. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय प्रेक्षणीय होणार आहे.