घरमनोरंजनआईला बालगंधर्व पुरस्कार, तेजस्विनी पंडितची आईसाठी भावनिक पोस्ट

आईला बालगंधर्व पुरस्कार, तेजस्विनी पंडितची आईसाठी भावनिक पोस्ट

Subscribe

तेजस्वीनीची आई म्हणजेच जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर ह्या देखील गेली अनेक वर्षे सिने सृष्टीमध्ये अभिनय करत आहेत. ज्योती चांदेकर यांना 'बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने' सन्मानित करताना मुलगी तेजस्विनी पंडित सुद्धा तिथे उपस्थित होती.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित(tejaswini pandit) हिने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि वेब्सिरीस मध्ये सर्वोत्तम काम करत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तेजस्वीनीची आई म्हणजेच जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर ह्या देखील गेली अनेक वर्षे सिने सृष्टीमध्ये अभिनय करत आहेत. या मायलेकींची जोडी प्रेक्षकांना मी सिंधुताई सपकाळ(mi sindhutai sapkal) या चित्रपटात पाहायला मिळाली होती. ज्योती चांदेकर यांनी आजवर मराठी मालिका आणि चित्रपटात उत्तम काम केले आहे. ज्योती चांदेकर यांना नुकताच मनाचा समजला जाणाऱ्या ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. याच संदर्भात तेजस्विनी पंडितने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून माहिती दिली आणि त्याचबरोबर तेजस्विनीने एक भावुक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

 

- Advertisement -

हे ही वाचा : मविआमधून बाहेर पडण्यासाठी अडीच वर्ष का लागावी? सुमित राघवनची पोस्ट चर्चेतhttps://www.mymahanagar.com/entertainment/why-should-it-take-two-and-a-half-years-to-get-out-of-mahavikasaghadi-sumit-raghavans-post/449513/

 

- Advertisement -

ज्योती चांदेकर यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास ५० वर्षे सिनेसृष्टीमध्ये काम करत आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली आहे. ज्योती चांदेकर यांना पुरस्कार मिळाला त्या क्षणाचा आनंद हा अर्थात अनमोल आहे. हाच आनंदाचा क्षण शब्दात मांडणं त्यांच्या कुटुंबियांसाठी कठीण होतं. दरम्यान ज्योती चांदेकर(jyoti chandekar) यांना ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने'(balgandharv jivan gaurav puraskar) सन्मानित करताना मुलगी तेजस्विनी पंडित सुद्धा तिथे उपस्थित होती. या आनंदाच्या क्षणाचे काही फोटो तेजस्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्याचबरोबर तेजस्विनीने तिच्या आईचा तोंडभरून कौतुक सुद्धा केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

तेजस्विनी तिच्या आईचं कौतुक करताना म्हणाली, की ‘मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने’
ज्योती चांदेकर ( आईला ) गौरवण्यात आले.
50 वर्षाची कारकीर्द !
अत्यंत कष्टाने साधलेला दीर्घ कला प्रवास 🤗
आईच्या व्यग्र schedule मुळे तिचा सहवास आम्हाला मुली म्हणून खूप उशीरा मिळाला, आईच्या हाताची चव आम्ही पहिल्यांदा वयाच्या 16 व्या वर्षी चाखली…अश्या “आई सोबत असण्याचे” अनेक क्षण आम्हाला अनुभवता आले नाहीत.
पण ह्याची अजिबात तक्रार नाही…कारण आमची आई आमचं घर संभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन , अनेक बलिदानं देऊन स्वतः चं अस्तित्व घडवत होती !
आणि आज तिला हा मानाचा पुरस्कार स्विकारताना बघून हा संघर्ष सार्थकी लागल्याचे आम्ही साक्षीदार झालो.

बाबा असता तर आईला हा पुरस्कार स्विकारताना तिचा आनंद द्विगुणित झाला असता ! कारण तिच्या ह्या यशामध्ये त्याचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण आई घरी नसताना बाप असून आईची भूमिका बाबाने लीलया पेलली…

आईच्या डोळ्यात समाधानाचे ,आनंदाचे अश्रू बघून तिचा वारसा मी पुढे चालवते आहे, त्याची जबाबदारी कळत नकळत खूप मोठी आहे आणि ती माझ्यावर आहे ह्याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच अत्यंत उत्तुंग कलाकाराची मी लेक आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.

अभिनंदन आई ♥️
आणि धन्यवाद बालगंधर्व परिवार !

ही पोस्ट लिहीत असताना तेजस्विनी तिच्या बाबांच्या आठवणीने भावुक झाली.

 

हे ही वाचा :  हेमांगी विचारतेय ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’ नेटकऱ्यांकडून मिळालं सनसनीत उत्तरhttps://www.mymahanagar.com/entertainment/the-hemangi-poet-asks-who-do-you-want-to-call-a-real-tiger-now-sensational-answer-from-netizens/449818/

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -