घरताज्या घडामोडी'मेरा दिल भी कितना पागल है!' गाणं गायल्याचा व्हिडिओ ट्विंकल खन्नाकडून शेअर,...

‘मेरा दिल भी कितना पागल है!’ गाणं गायल्याचा व्हिडिओ ट्विंकल खन्नाकडून शेअर, युझर्स म्हणाले प्लीज…

Subscribe

'मेरा दिल तो कितना पागल हे' गाणं गातानाचा व्हिडीओ ट्विंकलने शेअर केला आहे.ट्विंकलच्या हातात ब्लॉक कॉफीचा मग आहे. ट्विंकला लाडूंकडे पाहून 'सामने जब तुम आते हो कुछ भी खाने से डरता है', असे म्हणत आहे.

बॉलिवूडची स्पष्टवक्ती अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्ना (Twinkle khanna)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच काही इट्रेस्टिंग गोष्टी शेअर करत असते. ट्विंकल खन्ना इन्स्टाग्राम सध्या धुंद होऊन गाणी गाताना दिसत आहे. तिने अपलोड केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर दणकून कमेंट्स करत ट्विंकल खन्नाला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी ट्विंकलला थेट गाणं न गाण्याची ऑफर दिली आहे.

सोशल मीडियावर सध्या ट्विंकल खन्नाचा व्हिडीओ चांगलाच ट्रेंड होतोय. ट्विंकल खन्ना या व्हिडीओमध्ये डाळे बंद करुन मदहोश होऊन मजेशीर अंदाजात गाणं गात आहे. ‘मेरा दिल तो कितना पागल हे’ गाणं गातानाचा व्हिडीओ ट्विंकलने शेअर केला आहे. हे गाणे ट्विंकलने पती अक्षय कुमारसाठी गायले नसून तिच्या पुढ्यात टेबलावर असलेल्या लाडूंसाठी गायले आहे. तर दुसरीकडे ट्विंकलच्या हातात ब्लॉक कॉफीचा मग आहे. ट्विंकला लाडूंकडे पाहून ‘सामने जब तुम आते हो कुछ भी खाने से डरता है’, असे म्हणत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

- Advertisement -

ट्विंकल खन्नाने हा व्हिडीओ शेअर करत त्या खाली मजेशीर कॅप्शन लिहिलीय. तिने म्हटलेय, ‘खावे की खाऊ नही असा प्रश्न हॅम्लेटला पडला नसेल कारण त्याला कोणीही नाश्त्यासाठी लाडू आणून दिले नसतील. माझ्या ऑफ की सिंगिंगने मी माझे तोंड व्यस्त ठेवणे हाच एक उपाय आता आहे’.

- Advertisement -

ट्विंकलच्या गाण्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला ‘प्लीझ तुम्ही गाणे गाऊ नका’. काहींनी म्हटलेय ‘तुला काय हवे ते माग पण गाणे गाण्यासाठी तोंड उघडू नकोस’. एका युझरने लिहिलेय, ‘तुमचे गाणे ऐकून माझे दोन पोपट बेशुद्ध होऊन पडले’. आणखी एकाने म्हटलेय, ‘तुमचे गाणे ऐकून माझे ब्लूटूथ कोलॅप्स झाले’.


हेही वाचा – Sushant Singh Rajput Birth Anniversary: 5 करोड होती सुशांतची फी मात्र ‘या’ सिनेमात केवळ 21 हजारात केलं काम

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -