घरमनोरंजनअभिनेत्री ,लेखिका शर्वाणी पिल्लई करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

अभिनेत्री ,लेखिका शर्वाणी पिल्लई करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

Subscribe

अभिनेत्री , लेखिका शर्वाणी पिल्लईची नवी इनिंग!

अवंतिका मालिकेतील सानिका असो, आंबट गोड मधली इंदू असो, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील आदरणीय सकवारबाई असो, अगदी सध्या चालू असलेल्या मुलगी झाली हो मालिकेतील उमा असो अशा विविध मालिका तसेच विविध नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘पॅलेट मोशन पिक्चर्स’ असे तिच्या निर्मिती संस्थेचे नाव असून शर्वाणी पिल्लई आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत हे या निर्मिती संस्थेचे निर्माते आहेत.

“वर्दे आणि सन्स” या आगामी लोकेश गुप्ते दिग्दर्शित वेब सीरिजची निर्मिती पॅलेट मोशन पिक्चर्स करत असून अभिजित खांडकेकर, उपेंद्र लिमये, रेशम श्रीवर्धन, दीपक करंजीकर अशी दमदार कलाकार मंडळी या वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहेत. प्लॅनेट मराठीवर ही वेबसिरीज आपल्या पाहता येणार आहे

- Advertisement -

 

- Advertisement -

”२०१४ साली प्रदर्शित झालेला सौ शशी देवधर हा मी आणि सुश्रुत भागवत ह्यानी एकत्र लिहिलेला पहिला सिनेमा. पुढे आम्ही दोघांनी एकत्र येऊन व. पु. काळे लिखित बदली ह्या कथेचा कथा विस्तार केला आणि सुश्रुतने दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल उचललं. “अ पेइंग घोस्ट” प्रेक्षकांना आवडला. त्यानंतर एका नव्या विषयाची जुळणी चालू झाली. मधुकर रहाणे आणि रवी शिंगणे ह्यांनी निर्मिती केलेला, “असेही एकदा व्हावे” प्रेक्षकांनी तर उचलून धरलाच पण त्याच बरोबरीने ह्या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार सोहळ्यात सात नामांकन आणि दोन पुरस्कार मिळाले. एक वेगळा विषय हाताळण्याची संधी निर्माते सुधीर कोलते ह्यांनी देऊ केली ती “८ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी!” या चित्रपटाच्या निमित्ताने. सध्या ह्या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चालू असून आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.”

”निर्मिती क्षेत्रात आजवर प्रत्येक निर्मात्याने वैयक्तिक पातळीवर मालिका, चित्रपट, नाट्य निर्मिती करत आजवर उत्तमोत्तम कलाकृती रासिकांसमोर आणल्या आहेत. मी आणि अभिनेत्री – लेखिका शर्वाणी पिल्लई आम्ही जाहिरात क्षेत्रात पॅलेट मोशन पिक्चर्स ह्या निर्मितीसंस्थेमार्फत जाहिरातींची निर्मिती केली आहे. चित्रपट निर्मिती करताना पोस्ट प्रोडक्शन ही एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आम्ही आजवर पेलली आहे. चित्रपटसृष्टीत आजवर जाहीरपणे “आपलं सिंडिकेशन आहे ” हे सांगितलं गेल्याची उदाहरण मोजकीच असतील, किंबहुना नसतीलही. उदाहरणार्थ निर्मित, विप्लवा एंटरटेनमेंटस् एल एल पी, आणि पॅलेट मोशन पिक्चर्स ह्या तीन निर्मितीसंस्था एकत्र येणं हे केवळ इसापनीतीच्या एकीचे बळ ह्या गोष्टीचं उदाहरण आहे असं मला वाटतं. मेगाप्रोजेक्ट करण्याची ताकद मराठी ईंडस्ट्रीत निर्माण करणं व त्यासाठी मल्टीरीसोर्सैस एकत्र आणण ह्या विचारातुन सुश्रुत भागवत, शर्वाणी पिल्लई, संतोष गुजराथी, मनोज पाटील व सुधीर कोलते, विकास हांडे ह्यांनी एकत्र येऊन ह्या सींडीकेशनची कल्पना पुढे आणली आणि ह्या कल्पनेला प्लॅनेट मराठी चे अक्षय बरदापुरकर, पुष्कर श्रोत्री, अमित भंडारी, आदित्य ओक ह्यांनी फक्त स्वागत न करता त्याला पुर्ण पाठिंबा दिला.रसिक प्रेक्षकांनी आजवर जसं प्रेम आमच्यावर आमच्या कामावर केलं तसं ते ह्यापुढे सुद्धा नक्की राहील ह्या विश्वासावर आमचा हा एक छोटासा प्रयत्न, एक छोटं पाऊल, एक नवा प्रवास!” असे अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आणि लेखक, दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी सांगितले.


हे हि वाचा – “मन उनाड उनाड” म्युझिक व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -