Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनAdah Sharma : गुलाबी साडी गाण्यावर अदा शर्माचा आजीसोबत डान्स

Adah Sharma : गुलाबी साडी गाण्यावर अदा शर्माचा आजीसोबत डान्स

Subscribe

अभिनेत्री अदा शर्मा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्रीला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकरल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. चाहते आजही अदा हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

अदा शर्मा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवते. अदा शर्मा अनेकदा सोशल मीडियावर ती मराठीत संवाद साधताना किंवा एखादे मराठी गाणे गाताना दिसते. अनेकदा अदा तिच्या आजीचा उल्लेख करत असते. अशातच आता अदा आणि तिच्या आजीचा मराठी गाण्यावर धमाकेदार डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आता अदाही गुलाबी साडी या मराठी गाण्याच्या प्रेमात पडली आहे. अदाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आजीबरोबर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘गुलाबी साडी’ या मराठी गाण्यावर आजी आणि नात थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओत अदाच्या आजीने गुलाबी साडी नेसली आहे. आजीबद्दल कॅप्शनमध्ये लिहिताना अदा म्हणाली, “ज्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगते की ही माझी आजी आहे माझ्या खऱ्या आयुष्यातील हीरो” तसेच या व्हिडीओला तिने कॅप्शन दिली आहे. “द केरला स्टोरी, सनफ्लॉवर 2, बस्तर यातला तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे? आणि माझा कोणता आवडता आहे याचा अंदाज तुम्ही लावा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

 अदा आणि आजीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी कमेंट करीत अदा आणि आजीच्या डान्सचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट करीत लिहिले, “हिंदी चित्रपट खूप झाले. आता मराठीमध्ये एकदा येऊन तर पाहा. पुन्हा कुठे जाणार नाही.” यावर अदाने “नक्की” असा रिप्लाय दिला

दरम्यान, अदाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, अदाचा ‘बस्तर- द नक्षल स्टोरी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. ‘सनफ्लॉवर-2’ या वेब सीरिजमध्येही अदा सुनील ग्रोव्हरबरोबर झळकली होती.