Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनAdah Sharma : अदा शर्माने घेतला लग्न न करण्याचा निर्णय, म्हणाली

Adah Sharma : अदा शर्माने घेतला लग्न न करण्याचा निर्णय, म्हणाली

Subscribe

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे विविध रिल्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. अदाचा क्युट अंदाज तिला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करतो. तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतो. आजवर अदाने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीच भाष्य केले नाही. बॉयफ्रेंड किंवा रिलेशनशिपबद्दलही तिने कधी वाच्यता केलेली नाही. पण अलीकडेच अदाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. आपल्या लग्नाबाबत तिने केलेलं वक्तव्य ऐकून तुम्हाला धक्का लागू शकतो. (adah sharma reveals the reason why she dont want to marry)

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अभिनेत्री अदा शर्माने अलीकडेच एका मुलाखतीत लग्नाविषयी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी तिने आपल्याला लग्न करायचं नाही, असे सांगितले. तिच्या मते लग्न एक दुःखद स्वप्न आहे. या मुलाखतीत अदाला तिच्या ड्रीम वेडिंग आऊटफिटबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर उत्तर देताना तिने म्हटले, ‘लग्न न करण्याचं एक स्वप्न आहे. जर मी लग्न केलं तर ते माझ्यासाठी दुःखद स्वप्न ठरेल’. यावेळी अदाने लग्न करण्याची भीती वाटते असेही म्हटले.

रिलेशनशिपमध्ये येण्याची भीती वाटते का? असे विचारते असता अदा म्हणाली, ‘खरंतर मला कोणत्याही नात्याची भीती वाटत नाही. पण मला समजत नाही. मी स्क्रीनवर एव्हढं काही केलंय की, खऱ्या आयुष्यावरून विश्वास उडाला आहे. मी माझा सर्व आनंद गमावला आहे. माझा या गोष्टींवरून विश्वास उडाला आहे. पण तरीही भविष्यात जर मी कुणाशी लग्न केले तर मी ते कम्फर्टेबल आऊटफिटमध्ये करेन. पण जर मला अनकम्फर्टेबल कपड्यांमध्ये कोणाशी लग्न करावे लागले तर ते आणखी मजेशीर ठरू शकते. तथापि, मला तशी व्यक्ती निवडावी लागेल जी मला थीम टाईप गोष्टी करण्यास मदत करेल. अगदी ओव्हर-द-टॉप, कॅरीकेचर थीमसारखी.. ज्याचा प्रत्येकजण आनंद घेऊ शकेल. तसं खरं सांगू तर मलासुद्धा माहित नाही पुढे काय होणार आहे’.

हेही पहा –

Upcoming Movie : महिला दिनानिमित्त चंडिका चित्रपटाचे पोस्टर रिलीज