‘पृथ्वीराज’ चित्रपटातील ‘हरिहर’ गाण्याला मराठमोळ्या आदर्श शिंदेचा आवाज

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला भव्य ‘पृथ्वीराज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले होते. या धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून आता प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली असतानाच, या चित्रपटातील ‘हरिहर’ गाणं सुद्धा रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अवघ्या काही तासांमध्येच या गाण्याला लाखो व्हयुज मिळाल्या आहेत. याशिवाय या गाण्याला मराठी संगीतसृष्टीचा लाडका गायक आदर्श शिंदेचा आवाज लाभल्याने गाण्याला चारचाँद लागलेले आहेत.

पृथ्वीराज यांच्या जीवनगाथेवर आणि पराक्रमावर आधारित हा चित्रपट असून भारतीय इतिहासात इतिहासात मोठं योगदान ‘पृथ्वीराज’ चौहान यांनी दिलेले आहे. पृथ्वीराज चित्रपटामध्ये अक्षय सोबत संजय दत्त, सोनु सुद, मानुषी छिल्लर, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मेकर्सच्यावतीनं आता पहिलं गाणं व्हायरल झालं असून ते गाणं अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

 

‘हरिहर’ गाण्याचे संगीत शंकर एहसान लॉय यांचे असून गीतलेखन वरूण ग्रोव्हरनं केले आहे. आदर्श शिंदेशिवाय या गाण्याला आणखी काही गायकांनी या गाण्याला गायले आहे. हा चित्रपट ३ जून रोजी रिलीज होणार असून हिंदी सह इतर चार भाषांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :बॉबी देओलच्या ‘आश्रम’ वेबसीरिजचा तिसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित