घरमनोरंजनआदिलने प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझा वापर केला... राखीने केला खुलासा

आदिलने प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझा वापर केला… राखीने केला खुलासा

Subscribe

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 5 दिवसांपूर्वीच राखीच्या आईचे निधन झाले. त्यामुळे राखी सध्या खूप दुःखात आहे. आता अशातच राखीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात राखी तिचं लग्न धोक्यात असल्याचं म्हणत आहे. शिवाय राखी यात खूप रडताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी राखीने आदिलसोबत लग्न केलं होत मात्र, आता तो राखीला फसवत असल्याचं राखी म्हणत आहे.

आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीला गुरुवारी पुन्हा एकदा तिच्या जीमबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती पुन्हा मीडियासमोर रडू लागली. सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात राखीने आदिलबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. व्हिडीओमध्ये राखी म्हणतेय की, “मी अल्लाकडे दुवा मागेन…30 रोजे करेन…मी उमरा जाईन जर आदिल घेऊन गेला तर जास्त चांगलं होईल. नाहीतर माझे बरेच मुस्लिम भाऊ आहेत त्यांच्यासोबत मी उमरा जाईन. माझा अल्ला खरा आहे मी एक खरी बायको आहे..मी मनापासून हे लग्न स्विकारलं आहे त्यामुळे तो नक्कीच माझ्याजवळ पुन्हा येईल. जर आदिल माझ्यासोबत खरं वागत नाही म्हणजे तो दुसऱ्या मुलीबरोबर देखील खोटं वागत असणार, आदिल तु मला घटस्फोट देऊ शकत नाही. मी जगातल्या प्रत्येक कोर्टात जाईन, मी अल्लाच्या कोर्टामध्ये देखील जाईन. आदिलने फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझा वापर केला.” असं राखी म्हणाली.

राखी खासगी आयुष्यामुळे चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

राखी सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखी ‘बिग बॉस मराठी’तून बाहेर आली. त्यानंतर तिने आदिलसोबत केलेल्या लग्नाची बातमी जाहीर केली. बिग बॉस-14, नच बलिये, बिग बॉस-15 आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.


हेही वाचा :

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक कासिनाधुनी विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -