HomeमनोरंजनAdinath Kothare : आदिनाथ कोठारेचा नवा सिनेमा, 'बेनं'च्या शूटिंगचा श्रीगणेशा

Adinath Kothare : आदिनाथ कोठारेचा नवा सिनेमा, ‘बेनं’च्या शूटिंगचा श्रीगणेशा

Subscribe

आदिनाथ कोठारे हा मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. तो प्रसिद्ध सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा असला तरीही त्याची स्वतःची अशी विशेष ओळख आहे. त्यामुळे आदिनाथचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. गतवर्षी त्याचा ‘पाणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याच्या कथानकाने आणि गाण्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. अनेक गावांसह शहरांतही पाण्याची समस्या आहे. ज्यावर या चित्रपटाने भाष्य केले आहे. या चित्रपटानंतर नुकतीच अभिनेत्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचं नाव ‘बेनं’ आहे. (Adinath Kothare announced his new film Bena)

‘पाणी’नंतर ‘बेनं’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’ या चित्रपटाला भव्य यश मिळाले. या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या अभिनेत्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशातच त्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘बेनं’ असे असून नुकतेच त्याचे चित्रीकरण सुरू झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

अभिनेता आदिनाथ कोठारेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून याबाबत माहिती देताना एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये क्लॅप बोर्डचा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यावर ‘बेनं’ असं नाव लिहिलेलं दिसतंय.

‘बेनं.. एक नवं स्वप्न! एक नवा प्रवास सुरू’

या पोस्टमध्ये पुढे 2 व्हिडीओ आणि 2 फोटोदेखील दिसत आहेत. ज्यातील पहिल्या व्हिडीओत भल्या पहाटे एक जहाज खोल समुद्रातून वाट काढत पुढे जाताना दिसत आहे. तर पुढच्या पोस्टमध्ये रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात वळणाच्या वाटेवरून एक चारचाकी जाताना दिसतेय. त्यापुढील फोटोंमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त दिसतो आहे. आदिनाथने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘बेनं… एक नवं स्वप्न! एक नवा प्रवास सुरू…’.

चाहत्यांमध्ये उत्सुकता

आदिनाथ कोठारेने पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाबाबत उत्सुकता वाटू लागली आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार, त्यांच्या भूमिका काय असतील?, चित्रपटाचे कथानक काय असेल? याबाबत जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर झाले आहेत. अद्याप ‘बेनं’ या चित्रपटाबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, आदिनाथच्या या पोस्टवरील कमेंट पाहता चाहत्यांची उत्सुकता स्पष्ट दिसून येतेय.

आदिनाथ कोठारेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माझा छकुला’ या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केले. हा चित्रपट त्याचा अभिनय क्षेत्रातील डेब्यू चित्रपट होता. त्यानंतर ‘वेड लावी जीवा’, ‘दुभंग’, ‘सतरंगी रे’, ‘झपाटलेला 2’, ‘हॅलो नंदन’, ‘इश्क वाला लव्ह’, ‘पाणी’ अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. आता आगामी काळात ‘बेनं’ आणि ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या दोन चित्रपटांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही पहा –

Aaradhya Bachchan : बिग बींच्या 13 वर्षीय नातीची हायकोर्टात धाव, प्रकरण काय?