टीझरच्या वादानंतर ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

टॉलिवूड सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट वादात सापडत आहे. दरम्यान, नुकताच प्रभासने या चित्रपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये प्रभास दिसत आहे आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी हा चित्रपट 2023 मधील जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, आता काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

कधी प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’?

प्रभास, सैफ अली खान आणि कृति सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या चित्रपटाच्या टीझरमुळे वादात सापडला आहे. ज्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा चित्रपट 2023 मधील जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट 16 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

‘आदिपुरुष’चा टीझर पाहून नेटकरी संतापले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील टीझरवर अनेक स्तरातून आक्षेप घेण्यात आला होता. यामधील रावण आणि हनुमान नेटकऱ्यांना आवडले नाही. त्यामुळे चित्रपटामध्ये काही बदल करण्यासाठी या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येणार आहे.

‘आदिपुरूष’ या 5 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

नीतू कपूरने दिली आलिया आणि नातीच्या प्रकृतीबद्दल माहिती