Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन ‘आदिपुरुष’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

‘आदिपुरुष’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

Subscribe

टॉलिवूड अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री कृती सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून निर्माते चित्रपटाशी संबंधित नवनवीन अपडेट शेअर करत आहेत. अशातच काही तासांपूर्वी‘आदिपुरुष’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्याला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत.

‘आदिपुरुष’चा खास ट्रेलर प्रदर्शित

‘आदिपुरुष’च्या ट्रेलरची सुरुवात रामचरित मानसच्या चौपईने होते, जिथे हनुमान रामाची स्तुती करत आहेत. माणसातून देव बनलेल्या रामाची गाथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सीता हरणची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. राम-सीतेचे प्रेम, त्यांचा वनवास याशिवाय सीतेला परत आणण्यासाठी राम लंकेला गेल्याची कथा दाखवण्यात येणार आहे. राम-रावण युद्धाची काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या ट्रेलरला काही क्षणात लाखो व्ह्यूज मिळाल्या. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्साही झाले आहेत.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

- Advertisement -

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीता नवमीच्या मुहूर्तावर ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘राम सिया राम’चा ऑडिओ टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. सोशल मीडियावर प्रेक्षकांसमोर ठेवलेल्या या ऑडिओ टीझरच्या रिलीजसोबतच त्याच्या कॅप्शनमध्ये देवी सीतेचे वर्णन देखील करण्यात आले होते. ‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


हेही वाचा :

बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’चा डंका; पाच दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -